नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Apr 19, 2022

आई ही माझी लाडकी ...

 आई ही माझी लाडकी ...
गोड गोड बोलते ...
खोट खोट रागवते ..

आई ही माझी लाडकी ..
भातुकलीचा खेळ आम्हा शिकवते ..
बाराखडीचा खेळ आम्हा खेळून दाखवते ..

आई ही माझी लाडकी ..
छान छान जेवण बनवते ..
चिऊ ताईची गोष्ट सांगत सांगत घास भरवते ..

आई ही माझी लाडकी ..
डोळ्यांवर पट्टी बांधते ...
अनुभवाचे मोल आम्हां सांगते ..

आई ही माझी लाडकी ...

छोटया छोटया गोष्टीतून. आनंद घ्यायचा सांगते ..
रडायचे नाही कधी हेच नेहमी शिकवते ..

आई ही माझी लाडकी ..
आहे जगात भारी ..
नाही करू शकत कोणी तिची बराबरी ..
आई ही माझी लाडकी

दुर्गा मते

1 comment:

  1. खूप सुंदर रचना 👌👌

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...