लोकांना कितीही जीव लावा ते कधीचं आपले होणार .
कटू आहे पण हेच जीवनातील एकमेव परिपूर्ण सत्य आहे .
खरच ह्या दुनियेत आपण लोकांना खूप जवळ करतो . लवकर आपलं मानतो . ती चूक करतो . कारण हे कलियुग आहे. जो पर्यंत लोकांना आपली गरज आहे. किंवा आपण लोकांच्या मनासारखं वागतो . तो पर्यंत लोक आपल्याला त्यांच्या आयुष्यात स्थान देतात .
जेव्हा ती गरज संपते तेव्हा तिचं माणसं आपण वाऱ्यावर पडलो आहोत . अशी भावना मनात बाळगून आपल्याला आयुष्यातून बेदखल करतात .
तेव्हा आपण खूप रडारड करतो . डिस्टर्ब होतो . कुठे कमी पडले मी नातं निभवण्यात . मी खरच ह्यांच्या योग्यतेची नव्हती . का ? अशा नकारात्मक दृष्टीने आपण ही आपल्यालाच दोष देत बसतो .
पण जेव्हा आपण स्वतःला दोष देत असतो . तेव्हा खरं तर खूप मोठी चूक करत असतो . लोकं आपल्याला दोषी ठरवतात तेव्हा आपण ही आपल्याला दोष देत बसू नये . मी निर्दोष आहे . पूर्णपणे निर्दोष अशी भावना मनात ठेवून स्वतःला न्याय देण्याचा प्रयत्न करायचा . आणि स्वतःसाठी जगण्याचा प्रयत्न करायचा .
ह्या कलियुगात खरं तर लोकांच्या मनाचा विचार करत जगणंच चुकीचं आहे . कारण आजकाल ना खऱ्या माणसांची आणि खऱ्या भावनांची कदर केली जात नाही .
जी तोंडावर गोड गोड बोलतात आणि हळूवार पने पाठीत खंजीर खुपसतात तिचं माणस आजकाल लोकप्रिय व्हायला लागली .
त्यामुळे जगावं माणसाने स्वतःसाठी स्वतःच्या आनंदासाठी ..मी असो किंवा अजुन कोणी ही असो . स्वतः पेक्षा जास्त महत्त्व कोणालाही द्यायचं नाही . आणि जो व्यक्ती स्वतःपेक्षा जास्त आपल्याला महत्व देतो . आपल्या आनंदाचा जास्त विचार करतो . त्याचा insult करायचा नाही . आणि ब्लॉक लिस्ट त्यांच्यासाठी कधी राखून ठेवायची नाही .
आणि सर्वात महत्त्वाच ..लोकांना कितीही जीव लावला तरी ती आपली होतं नाही . हे शेवटच्या श्वासापर्यंत नाही विसरायचं . ह्या जगात जिवापाड प्रेम करणारे फक्त आई वडील असतात . त्यांच्या आपल्याकडून काहीचं अपेक्षा नसतात. बाकी सारं जग मतलबी त्यांच्या फायद्यानुसार आपल्याला महत्व देतात .
दुर्गा मते
अगदी बरोबर...खूप छान लेख..👍✍️👌🍫🍫🍫🍫🍫🍫
ReplyDelete