दुःख तिचे नाही क्षणासाठी ...
नाही तिचे जगणे स्वतःसाठी ..
ह्याचं करेन त्याचं करेन ..
ह्यातच तिचं आयुष्य सरेन ..
प्रेम माया ममता ह्याची ती सावली ..
स्त्री ही उभ्या जगाची माऊली ...
सोसते कळा , जन्म देण्यास बाळा ..
लावला तिने ह्या सृष्टिस लळा ..
स्त्री जन्म हा भाग्याचा ..
फेडे ऋण उभ्या आयुष्याचा ..
दुर्गा मते
No comments:
Post a Comment
Comments plz.