नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Apr 8, 2022

सुवासिनी हळव्या मनाची ..

मी तिला पुन्हा नव्याने भेटलो .
पाहता क्षणी तिच्यावर भाळलो ..

गुलाबाचे फूल तिच्यासाठी नेलेले ..
नकळत तिच्या केसांत मी माळले ..

प्रेमपत्र पहिले लिहिलेले ..
तिने कधीचं नव्हते वाचललेले ..
तिला मी ते आज वाचण्यास दिले ..

शब्द आणि भावना ह्यांनी योग्य सांगड घातली ..
मोगऱ्याच्या मोहक सुंगधात  ही भेट घडली ..

आज ती तेवढीच सुंदर दिसत होती .

25 वर्षा पूर्वी दिसायची त्याहूनही सुंदर बहुधा

ती आज दिसत होती ..

हळव्या मनाची राणी माझी ...

कोणा दुसऱ्याची सुवासिनी म्हणून मला भेटायला आली होती ....

मी  पुन्हा भेटायला येईल ...

हे वचन तिने पाळले ..

मी तिच्यावर केलेल्या प्रेमाचे सार्थक झाले ..
दुर्गा मते


3 comments:

  1. खूपच सुंदर रचना.....👌👍✍️✍️✍️🍫🍫🍫🍫🍫

    ReplyDelete
  2. छानच 👌
    आधीच्या पोस्टला नाव नाही दिलेलं
    ते नामकरण करावे
    आबा
    🙏

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...