नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Apr 10, 2022

प्रेयसी च्या आयुष्याला समर्पित .

किती क्षणाच आयुष्य उरलय माझ् ..
करून करून किती करशील ग तिरस्कार आज ..

प्रेम केलं ह्याची का ही सजा ..
करतेय मला तुझ्या आयुष्यातून वजा .

काय मागितलं होत तुझ्याकडे ..
तुझ्या गोड आठवणी सोबत थोडासा सहवास ..
हवा होता मला माझ्याकडे ..

नसतं केलं तुझ्या आयुष्यात कधी इंटर फेअर ..
नेहमीच एक चांगला मित्र म्हणून घेतली असती केअर ..

शारीरिक सहवास नको हवा होता मला ..
तुझ्या मनाच्या एका कोपऱ्यात माझे नाव पाहिजे होते मला ...

प्रीतीला बहर नवा हवा होता ..
हा इरादाच कधी माझा नव्हता ..

तुझ्यावर प्रेम करण्याचा अधिकार हवा होता ..
तुझा चांगला मित्र असण्याचा अधिकार मला गमवायचा नव्हता ..

तुला मनासारखा जोडीदार मिळाला ..

तो क्षण तुझ्याही पेक्षा खास माझ्यासाठी ठरला ..

कारण त्या दिवशी एक जिवलग कायमचा उध्वस्त झाला .प्रेयसीला तो आयुष्यातील वर्दळ वाटू लागला ..

रचना ही विषाचा एक घोट पिऊन रचली...
माझ्या प्रेयसीच्या सुखी आयुष्याला समर्पित केली .
दुर्गा मते

2 comments:

  1. खूपचं सुंदर रचना..👌👍✍️✍️✍️🍫🍫

    ReplyDelete
  2. खूप सुंदर रचना 👌👌👌

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...