आनंदी बापाची लाडकी लेक . तिच्यासाठी उभ्या जगाशी भांडणारा हा जगातील पहिला बाप असेल . आपल्या लाडोबला कधीही बिना पैंजनाच ठेवायचं नाही . हा त्याचा हट्टचं का आणि कशासाठी हे आनंदीला कधीचं नाही समजलं ....
" पहिली बेटी धन की पेटी " असं म्हणत राजाराम भाऊने आनंदीला लहानाचं मोठं केलं . तिच्या पहिल्याbirthday पासून ते आनंदीला एकच gipt देत आले ते म्हणजे पैंजण आणि ते ही , ते पैंजण ते स्वतः तिच्या पायात घालायचे अगदी आनंदाने , कोणी जळाव आणि दृष्ट लागेल असं प्रेम होत . बापलेकीच एकमेंकावर ...
आता आनंदीचा अठरावा birthday जवळ आला होता . ती बाबाला सहज बोलून जाते . " बाबा तुम्ही मला दरवेळेस birthday ला पैंजण गिफ्ट देता ह्या वेळेस काहीतरी वेगळं द्या ना , आणि जर पैंजण च द्यायचं असेल तर मग पैंजण च का ह्याचं सिक्रेट सांगा . "
बाबा मोरक हसतात आणि म्हणतात , " मी तुला ह्या वेळेस काहीतरी वेगळं गिफ्ट देईन आणि पैंजण च का ह्याचं सिक्रेट पण सांगेन . अठरावा birthday स्पेशल असेल माझ्या लाडोबाचा . "
ती मोठ्या उत्सुकतेने विचारते , "बाबा काय गिफ्ट देणार तुम्ही मला अठराव्या birthday ला सांगा ना प्लीज , " " अरे ते सरप्राइज आहे ना आधीच कसं सांगणार , सांगेन वेळ आल्यावर . काळजी करू नकोस गिफ्ट तुला आवडेल असच असेल ."
ती म्हणते , " ठीक है बाबा तुम्ही बोलतायं म्हणजे गिफ्ट छान असणारं असं म्हणत ती घराबाहेर पडते . "
Birthday ला तिच्या मोजून दोन च दिवस बाकी होते म्हणून ती काही हट्ट करत नाही . बाबाचा लाडोबा असला तरी खूप समजूतदार होता तो लाडोबा ...
आज खूप उशीर झाला होता तिला , घरी परतायला म्हणून तिचे बाबा खूप काळजी करत होते . सांजवेळ सरुन गेली होती . एवढा उशीर आजपर्यंत तिला कधीचं झाला नव्हता म्हणून आई ही काळजी करत होती .
तेवढ्यात एक अनोळखी नंबर वरुन कॉल येतो . आनंदी देसाई आपली मुलगी आहे का तिचा बायपास हाय वे वर खूप मोठा axident झाला आहे . तुम्ही तात्काळ " सिटी हॉस्पिटलमध्ये पोहचा . "
फोन खाली ठेवताच क्षणाचाही विलंब न करता ते हॉस्पिटलमध्ये पोहोचतात . लाडक्या लेकीचं अंग रक्ताने माखलेले पाहून राजाराम भाऊ खूप अस्वस्थ होतात . पण
घरच्या लक्ष्मीला सावरत ते म्हणतात , " काही होणार नाही आपल्या लाडोबाला तो वर बसलाय ना तो सार सुरळीत करेन . "
तेवढ्यात डॉक्टर येतात आणि म्हणतात , " तुमच्या मुलीची conditition खूप क्रिटिकल आहे . वेळेत हवी ती अँक्शन घेतली नाही तर , जीवास धोका पोहचू शकतो . "
तेवढ्यात राजाराम भाऊ बोलतात , " जेवढे पैसे लागतील तेवढे लावायची तयारी आहे माझी लवकरात लवकर तुम्ही हवी ती अक्शन घ्या . उपचारात कसलीही कमतरता राहायला नको . "
त्यावर डॉक्टर म्हणतात , " तुमच्या मुलीचं हृदय कामातून गेलंय ते चेंज करावं , त्यासाठी आपल्याला hurt doner
शोधावा लागेल . आणि कोणतंही हृदय नाही . जे मॅच होईल तिच्या हृदयाला तेचं हवं . "
राजाराम भाऊ डॉक्टरांचं बोलणं ऐकून खूप tress घेतात . पण धीर नाही सोडत . लागलीच ते प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जाऊन hurt doner शोधतात . पण यश काही मिळतं नाही . सेम टू सेम hurt doner काही मिळाला नाही . मग शेवटी राजाराम भाऊ स्वतः चं हृदय तिला अर्पण करायचं ठरवतात . साऱ्या प्रोसिजर क्लिअर करून ते तिला आपल हृदय अर्पण करतात .
Hurtdonet करण्यापूर्वी ते एक ऑडिओ क्लिप तयार करतात . आणि मगच प्रोसीजर साठी जातात .
आपल्या लाडोबाला जीवदान देताना आपल कपाळा च कुंकू मिटल्या जाणार माहीत असताना सुद्धा खंबीर रहाणाऱ्या त्याच्या अर्धांगीला माझा सलाम ...
प्रोसिजिर होतात . Hurtdonet करता क्षणीच राजाराम भाऊ हे जग सोडून जातात .
आकाशात तारा होऊन चमकतात .
आता त्यांच्या मुलीची परिस्तिथी बऱ्यापैकी बरी होती . तिला ऐन तिच्या birthday च्या दिवशीच सुट्टी मिळते .
आणि ती तिच्या आईबरोबर घरी येते . सारे दिसताय पण आपला लाडका बाबा दिसत नाही ह्या गोष्टीचं तिला खूप वाईट वाटतं . ती आई ला म्हणते , " आई बाबा कुठं य ग मला सगळ्यांत आधी त्याच्या कुशीत शिरून रडायचं ग मी बरी झाले ह्याचा आनंद सेलिब्रेट करायचा , ग बोलव ना त्याला लवकर . आज माझा birthday ही आहे . तो मला काहीतरी स्पेशल गिफ्ट देणार होता त्याची तयारी करतोय का ? " तिची काहीचं न बोलता बाबां च्या फोटोकडे हात दाखवत म्हणते , " तो तिथे य तुझा बाबा , आणि ती तिथे जी फोटोखाली जी क्लिप ठेवलीय ना ती क्लिप च तुझी ह्या birthday च गिफ्ट आहे बेटा ."
निशब्द होऊन आनंदी ती क्लिप हातात घेते आणि क्षणाचा ही विलंब न करता ती क्लिप ऐकते .
बेटा तू मला सतत विचारायची ना मी पैंजण च का गिफ्ट करतो तर ऐक बेटा , " तुझ्या पैंजनची छुन छुन ऐकल्यानंतर तू आनंदात आहे असं मला फिल व्हायचं माझं अल्लड पिल्लू कायम आनंदित राहावं असच मला वाटयाच म्हणून मी तुला नेहमी पैंजण गिफ्ट करायचो .
तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घातल्यानंतर तू मला परकी तर होशिलच पण अबोलही होशील . प्लीज बाळा मी काळाच्या ओघात असेन नसेन पण प्लीज तू तुझे पाय बिना पैंजनाचे कधीचं ठेवायचे नाही . हे माझ्याकडून तुला शेवटचं पैंजण माझी आठवण म्हणून कायम जप बाळा याला . आणि तू मला विचारलं होत ना मला अठराव्या birthday ला काय स्पेशल गिफ्ट देशील तर मी तुला माझं हृदय गिफ्ट दिलंय , तुला पुनर्जन्म दिलाय आवडलं ना गिफ्ट तुझा प्रिय बाबा ....नेहमी सुखात रहा बाळा माझं संपूर्ण आयुष्य तुला लाभो हीच ईश्र्वर चरणी प्रार्थना...!!"
क्लिप ऐकुन आनंदी च्या पायाखालची जमीनच सरकते .
ती ओक्साबोक्सी रडते आणि म्हणते , " बाबा मी तुझी आठवण जिवापाड जपेन आणि वचन देते तुला मी माझे पायात पैंजण नेहमी घालत जाईन ...."
खुप सुंदर ह्रदयस्पर्शी कथा आनंदीची...👌👍💐🍫
ReplyDeleteखुप सुंदर...निःशब्द 🙏🏼🙏🏼🙏🏼
ReplyDeleteअतिशय हृदयस्पर्शी कथा,निःशब्द👌👌👌👌👌🙏🙏
ReplyDelete