काळोख्या ला गरज प्रकाशाची ,
प्रकाशाला गरज काळोख्याची ,
पुस्तकाला गरज वाचंकाची ,
वाचकांना गरज पुस्तकांची ,
लिखाणाला गरज विचारांची ,
विचारांना गरज प्रेरणेची ,
समाजाला गरज कुटुंबाची ,
कुटुंबांना गरज समाजाची ,
मित्रांना गरज चांगल्या मित्रांची ,
मैत्रिणींना गरज चांगल्या मैत्रिणींची ,
चार भिंतीना गरज घराची ,
घराला गरज बोलक्या माणसांची ,
एका दगडाला गरज एका मुर्तिकाराची ,
मुर्तिका राला गरज त्याच्या कलेची ,
लिहिणाऱ्या पेनाला गरज वहीच्या पानाची ,
पा नाला गरज सुंदर अक्षरांची ,
उगवणाऱ्या सुर्यालाही गरज , मावळ नाऱ्या सूर्याची ,
प्रत्येकाला गरज असतेच प्रत्येकाची ,
मला काही गरज नाही ,
ह्या वाक्याला अर्थ नाही काही ..
"Durga".
सुंदर रचना !✍️👌👌👌
ReplyDeleteसुंदर रचना केली दुर्गा!शब्दसामर्थ्य अतिशय सुंदर!👌👌👌
ReplyDeleteKhara aahea tuza...nitya...khup chaan👌🍫👍✍️
ReplyDelete