अपराध माझे खूप असतील ,
अवेळी मला सतावतील ,
तुझ्या मनात मी भावना शून्य असेल ,
वेदने तूला सहज कळेल ,
प्रानाहूनही तू प्रिय माझ्यासाठी ,
आयुष्याच्या सांजवेळी आधाराची काठी ,
तुला लहानाचे मोठे करताना कमी पडले असेल ,
ठीफी मागण्याची तडजोड नसेल ,
रक्ताचे पाणी तुझ्यासाठी आटवले ,
ओंजळभर सुख कधी नाही जपले ,
तुझ्यासाठी दुःख मी अंगावर झेलले ,
काय चुकले माझे आजही नाही कळले ,
तू उतार वयात वृध्द आश्रमाचे दरवाजे दाखवले ,
सनाथ असतानाही अनाथ केले ,
मी माया आणि प्रेम दिले ,
तू परके पणाचे घाव दिले ,
असे कसे रे पांग आई बाबा चे फेडले ,
उतारवयात रस्तावर सोडले ,
ह्यासाठी का तुला लहानाचे मोठे केले ?
छानच उपकार फेडले जन्म दात्याचे ....
अप्रतिम सुंदर लिखाण 👌👌👌👌👌🍬🙏
ReplyDeleteहृद्यस्पर्शी लेखन...!🤭😌😢
ReplyDeleteभावस्पर्शी लेखन केले...✍️🤭😔😔
ReplyDeleteखुप भावस्पर्शी 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
ReplyDelete👌👌👌👌👌खूप सुंदर रचना.
ReplyDeleteअप्रतिम अप्रतिमच लिखाण .. नित्या 👌👌👌👌👌
ReplyDelete