आजचा माझा विषय आहे समलिंगी संबंध पाप नाही . आज जरा वेगळा विषय हाताळते , चुकून गैरसमज करून घेऊ नका की मला atracation आहे की काय एखाद्या मुलीबद्दल तर , असं काही नाही . मला सामाजिक विषय हाताळायला आवडतात म्हणून लिहितेय .
आज जग पुढे गेलं असलं तरी काही , रुढी परंपरा अजुनही भूरसटलेल्या विचारांच्या आहे . प्रेम प्रकरण , जातीबाह्य विवाह करणारे लोक ह्यांना समाजात योग्य तो मान - सन्मान नाही मिळत . वेळप्रसंगी वाळीत टाकण्यात येत . ह्या रुढीबरोबरचं जोडण्यात आलेली आहे अजुन एक समलिंगी संबंधांची रुढी .....!!!!!
समलिंगी संबंध असलेल्या मुला मुलींना खूप तूच्श मानलं जातं . समलिंगी संबंध असणाऱ्या लोकांना एवढी भीती असते . की त्यांना त्यांचं नातं समाजापासून लपवून ठेवाव
लागतं . ते उगडिक आलं तर भयानक शिक्षा नां सामोरे जावं लागतं . " असं का ?"
" समलिंगी संबंध हे काही पाप आहे का ? ती काही चूक आहे का ? "
ती चूक असेल तर मग ती त्यांच्या जन्मतःच झालेली आहे . ( हा पॉईंट मी धर्म आणि हिंसा ह्या पुस्तकातून घेतला आहे )
हो ती त्यांच्या जन्मतःच झालेली आहे .
जन्मा ला येताना आपल्या लैंगिक प्रेरणा कशा असाव्यात हे ठरवणं माणसाच्या हातात नसतं . अशा वेळी बहुंताश माणसांच्या लैंगिक प्रेरणा ह्या भिन्नलिंगी आकर्षनाच्या असतात . त्याचं बरोबर तुरळक लोकांच्या प्रेरणा समलिंगी आकर्षण च्या असतात . म्हणून त्या चूक हे ठरवण्याचा अधिकार कोणालाच असता नये . पण जे सर्वसामान्य नाही ते विकृत , अनैसरगिक , ईश्र्वर अमान्य , कारण ईश्र्वरान स्त्री निर्माण केली तिचं मुळी पुरुषांच्या सुखासाठी आणि प्रजोत्पसाठी अशा धारणा माणसाच्या मनात धर्मग्रथानी पक्क्या करून टाकल्या आणि त्याविरुद्ध जनाऱ्याला शिक्षाही निश्चित केली .
शिक्षा अश्याच गुन्हयाला केली जाते . तो समजून ऊमजून केला जातो , ज्यांन दुसऱ्याच्या जीवित - वित्ताची हानी होते अथवा शारीरिक - मानसिक छळणुक केली जाते . पण एकतर समलिंगी संबंध ठेवणारी माणसं ही अन्य कोणाचीच कसलीच हानी करत नाही . आणि दुसरं म्हणजे समलिंगी संबंधांच आकर्षण ही जर चूक असेल , तो जर बिघाड असेल तर तो त्यांच्या जन्मतःच झालेला असतो .
ज्या बिघाडामुळे अशी माणस ज्याला आपण सर्वसामान्य आयुष्य म्हणतो , तसं आयुष्य जगू शकत नाही . त्यांना त्यांच्या लैगिंक सुखासाठी वेगळ्या वाटा शोधव्या लागतात . आणि मुख्य म्हणजे ही त्यांची हौस नसते , हे त्यांना वाटणारं वैविध्यच आकर्षण नसतं , तर तो त्यांचा नाईलाज असतो .
मग त्यांचा नाईलाज आपण चूक कसा म्हणू शकतो . समलिंगी संबंध हे पाप नाही . ती त्यांची हौस नाही . मग तरीही का समाज त्यांना स्वीकारत नाही . का त्यांना आपले संबंध समाजापासून लपवून ठेवावें लागतात .
का मनामारुंन आयुष्य जगावं लागतं .
हा विचार बदलायला हवा त्यांना ही समाजात योग्य तो मान सन्मान मिळायला हवा . त्यांनाही ही आपलं नातं मिरवण्याचा एक मोकळा श्वास घेण्याचा अधिकार आहे . तो अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही .
सखोल आणि तितकाच उत्तम लेख ।
ReplyDelete☺️✌️
छान, विचार करायला लावणारा लेख ✍️👌
ReplyDelete