नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Sep 29, 2021

नको आज चार भिंतीतील शाळा

बाई नको आज चार भिंतीतील शाळा ,
आज जरा अनुभवुया निसर्गातील कला ,

थांबवूया जरा आपुले लिहिणे वाचणे ,
ऐकुया  भिरभिरणाऱ्या पाखरांचे जीवनगाणे ,

पुस्तकाला थोडा वेळ ठेऊया दफ्तरात ,
शाळा भरवूया निसर्गाच्या सानिध्यात ,

आज चार भिंतीतील शाळेला लावुया कुलूप ,
अन् जाऊया पाहायला निसर्गाचा मुलुख ,

पुस्तकातल्या शब्दाचे अर्थ शोधुया नंतर ,
आधी दुरावलेल्या मानव आणि निसर्गाचे कमी करूया अंतर ...

बाई वर्गात शिकवलेली कवीता  ,
मला निसर्गाच्या सानिध्यात ऐकवा ,

कवितेविषयीची गोडी माझी वाढवा ,
निसर्गावर सुंदर काव्य ही मला सुचवा ,

आज पुस्तकातील प्रश्नांना. बाजूला ठेवूया ,
निसर्गातील प्रश्नांची उत्तरे आपण शोधूया ,

चार भिंतीतील शाळेला आज आराम देऊया ,
निसर्गातील गमंती - जमंती नव्याने शिकुया .........


6 comments:

  1. खूप खूप सुंदर लिहिलंय अप्रतिम कल्पना👌👌👌👌👌👌

    ReplyDelete
  2. वाहहह... खुप सुंदर रचना...👌👍💐🍫

    ReplyDelete
  3. अतिशय सुंदर 👌👌👌👌

    ReplyDelete
  4. छान लिहीलयस 👌👌👌

    ReplyDelete
  5. अतिशय सुंदर रचना👌👌👌👌

    ReplyDelete
  6. मस्त लिहलं!निसर्ग गुरुजींच्या शाळेत नाव दाखल झाले तर जीवन समृद्ध होईल!

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...