रावसाहेब साधारणपणे पन्नाशी पार केलेले . प्रौढ व्यक्ती नुकतेच त्यांच्या पत्नीचे कॅन्सर अभावी निधन झालेले.
मुलाबालाचे लग्न झालेले घरी लेकी सूना आलेले .
घरची परिस्थिती खूपच छान कधी काही कमी पडणार नाही . वडीलापोर्जित प्रॉपर्टी असल्या मुळे परिस्थिती सर्वसामान्य होती .
त्यांची पती स्वर्गवासी झाल्यानंतर त्याच्यावर खूपच वाईट दिवस आले . शेवटी सूना ह्या सूना असतात . कितीही जीव लावला तरी ही त्या कधी लेक होत नसतात.
हे वाक्य कलियुगात घरोघरी रुजताना दिसतं . मुलांनी घर दार नावावर करून घेतले . वडिलांकडे दुर्लक्ष करू लागले . लेक सूनाच्या अशा वागणुकी नंतर रावसाहेब
रावांच्या डोक्यात खुळ शिरलं पुनर्विवाहाच त्यांच्या पुनर्विवाहा चा गावात चर्चेचा विषय झाला . हि बातमी त्यांच्या मुलांच्या कानावर पडली .
त्यांच्या दोन्हीही मुलांनी त्यांच्या अंगावर हात उचलला . त्याचा रावसाहेब रावांना खूप राग आला . नंतर त्यांनी निर्णय घेतला . लेका सूनातून वेगळ राहण्याचा . दुसऱ्याच दिवशी त्यांनी त्यांचा पसारा उचलला . आणि ते घरापासून खूप दूर राहायला गेले .
सुरुवातीला त्यांना स्वयंपाक बनवता येत नसल्याने ते दुसऱ्याच्या चं घरी जेवायला जायचे . ज्या घरात ते नेहमी जेवायला जायचे. त्या घरात एकवीस वर्षाची तरुणी होती . अनामिका तिचं नाव तिचं त्यांना जेवायला वाढायची . सकाळीच अंगोळीला पाणी नेऊन द्यायची.
त्यांच्या पुनर्विवाहाची बातमी तिच्या ही कानावर पडली होती . त्यांच्या रूटीन ला जवळपास महिना झाला होता . कळत नकळत अनामिका राव साहेबाच्या प्रेमात पडली . आणि तिने एके दिवशी त्या प्रेमाची कबुली दिली .
त्या दिवशी राव साहेबांना खूप वाई ट वाटले .
" बाळा तू माझ्या मुलीप्रमाने आहेस . मी तुझ्या शी लग्न कस करणार. तुझे आई वडील काय विचार करतील माझ्या बद्दल " ते तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करू लागले . पण तिने काही समजून घेतले नाही . .
मुलगी हुड बुध्दीची आहे . हे लक्षात घेऊन रावसाहेब रावांनी ही बातमी तिच्या आई वडिलां च्या कानावर घालून तिचं लवकरात लवकर लग्न करून देण्याचं सुचवलं आणि तूर्तास त्यांचा तेथील मुक्काम काही काळासाठी स्थगित केला . आणि ठरल्या प्रमाणे पुनर्विवाह केला .
अनामिका चेही खूप सुंदर मुलाशी लग्न झाले . दोघेही आपल्या आपल्या आयुष्यात समाधानी आहेत . एकमेकांच्या मनात एकमेकांसाठी आदर ही आहे .
No comments:
Post a Comment
Comments plz.