लावली मी पैंज प्रेमाची ..
रेखा बदलली नशीबाची ..
तोडली नाळ पुस्तकांची ..
अल्लड वय निसटून गेले ..
मी प्रेम रंगी रंगले ...
शिकून मोठं होण्याचे स्वप्न ही भुलले ..
वेड विश्व मनानी तयार केलं ..
त्याच्या पायी शिक्षणाचं स्वप्न निकामी झालं ..
हसत्या- खेळत्या आयुष्याला वेगळंच वळण मिळालं ..
अस्थिर मन स्थिर झालं ..
आई वडिलांचं नाव धुळीस मिळालं ..
तेव्हाच कुठेतरी माझं चुकीचं स्वप्न खुंटल ..
दुर्गा मते
काल्पनिक रचना माझ्या आयुष्याशी संबधित नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी ..
No comments:
Post a Comment
Comments plz.