काय लिहलय आयुष्याच्या भाळी ..
काळोख पसरलाय रित्या आभाळी ..
वाऱ्याचा मंद स्पर्श उभारी जीवनाला देतो ..
अंधाऱ्या रातीतून सुर्य रोज नव्याने जन्म घेतो ..
वृक्ष - तरू - वेली मोकळा श्वास घेण्यास मदत करतात ..
सांजवेळी भविष्याच्या सुंदर गुजगोष्टी मजला आठवतात.
मुक्तपणे जीवन मी जगते ....
निसर्गाच्या सानिध्यात रोज आनंदी राहते ..
आयुष्य सुंदर आहे की नाही , माहीत नाही ..
पण मी त्याला सुंदर बनवलय ..
जेव्हा जेव्हा परिस्थितीने त्याच्याकडे पाठ फिरवली ..
तेव्हा तेव्हा मीच त्याला मनवलयं ..
आयुष्य नावाचा सुंदर प्रवास आनंदाने पार केला ..
नियतीच्या क्रूर चक्रात विजय माझाच झाला ..
मग माझ्या आयुष्याला मीच सलाम केला ..
दुर्गा मते
No comments:
Post a Comment
Comments plz.