नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Jan 26, 2022

मनाची दुसरी बाजू ..

आज मी ह्या लेखा मध्ये मनाची दुसरी बाजू मांडणार आहे ....

मन शरीरातील एक अनमोल घटक . ज्याचं मन चांगलं तो सर्वांचा आवडता व्यक्ती असतो . माणूस दिसायला कसा ही असला तरी चालतो . फक्त त्याच मन चांगलं असायला हवं . असं आपण बोलता बोलता नेहमीच बोलून जातो . आज मी त्याचं मनाची दुसरी बाजू मांडणार आहे ..

" जे वैरी न चींती , ते मन चींती " ह्या वाक्य सर्वांनीच ऐकलेल असेल . आणि खरच ते खूप खरं आहे . खूप सत्यता आहे.  त्या वाक्यात . त्याला अनुसरूनच लिहिणार आहे मी आज . 

आपलं मन जितका चांगला विचार करतो ना , त्याच्या पेक्षा दुपटीत वाईट विचार करत असतो.  

नात्यात दुरावा किंवा गैरसमज निर्माण करण्याचं काम ही त्या मनाची नकारात्मक शक्तीच करत असतं.  मन हे कधी स्थिर राहत नाही.  सतत बदलत असतं . 

समोरचा थोडस मनावीरुद्ध वागायला लागला की , तो नावडता होतो . काही काळाने तोच जर मनासारखं वागायला लागला तर तोच व्यक्ती सर्वात जास्त आवडायला लागतो . 

कधी कधी मनात नसताना कळतं नकळत बरच काही घडून जातं . त्याला जबाबदार हे मन चं असतं . आपल्याच माणसांबद्दल ते क्षणात आपलेपणा निर्माण करत तर , क्षणात दुरावा निर्माण करत . हे मन हे ना खूपच वाईट कुठे असतं , ह्याचा शोध आज पर्यंत लागला नाही . आणि ते अस का असेल ह्याचा शोध तर लागुच शकत नाही ...
  

    थँक्यू ! 🙏🙏🙏🙏🙏🙏

1 comment:

  1. अगदी बरोबर..." मन करा रे प्रसन्न , सर्व सिद्धीचे कारण "
    खुप सुंदर लिहीलस आहेस नित्या... अप्रतीम लेखनशैली...पुढील लिखाणासाठी शुभेच्छा...💐💐💐👏👏👏😍🍫

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...