ताऱ्यानी भरलेले आकाश , बाजूला समुद्र किनारा ,
पण अपूर्ण आहे , तुझ्याशिवाय हा सुंदर नजारा ....
जरी ही चांदण्याची सुवर्ण रात ,
तरीही अपूर्णच प्रेमाची बरसात ..
नाही ना सख्या हातामध्ये तुझा हात ..
चंद्र तो नभातला रुसून बसला ,
चांदणीचा ह्या जीव सारा तुझ्या मध्ये होता अडकला ..
फुलांची उधळण तिने तूझसाठी होती केली ,
तरीही सुगंधाची अत्तरे नव्हती धरवळली ..
तू नव्हता ना सभोवताली ...
ताऱ्यानी भरलेले आकाश , बाजूला समुद्र किनारा ,
पण अपूर्ण आहे तुझ्याशिवाय हा सुंदर नजारा ..
Durga mate
©®
WOW...!
ReplyDeleteखूपच सुंदर...!!
अप्रतिमच...👌
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
आबा
सुरेख
ReplyDelete