इतकही छळू नकोस मला ,
वेळ निघून जाण्याआधीचं सांगते तुला ..
तुझ छळन तुलाच त्रास देईल .
वेळोवळी जेव्हा आठवण माझी येईल ..
तुझ असच वागणं चालू राहिलं ,
थोड ही नाही बदललं .........
तर मीच सोडून जाईल तुला ते ही कायमची ..
कधीचं परत न येण्यासाठी ...........
विरहात तू रडशील ,
माझ्या आठवणीत तडफडशील ..
जगणं तुझ तू हरवून बसशील .
श्वास घेणं सोडून देशील ...
माझ्या आठवणींत झुरत राहशील ..
माझ्या प्रेमाला मात्र कायमचा मुकशिल ...
आधीच सांगते तुला ..
इतकाही छळू नकोस मला ..
तुला सोडून जावं लागेल मला ..
काल्पनिक रचना ..
दुर्गा मते
©®
Sundar Rachna 👌👌👌👌
ReplyDelete