शोधतेय मी तुला ,
माझ्याच मौनात ..
आठवणींच्या हिंदोळ्यात ..
शोधतेय मी तुला ..
नभाच्या कुशीत ..
कधीतरी माझ्याच ,
डोळ्यांच्या ओलसर पापणीत ..
शोधतेय मी तुला ..
दाटून आलेल्या माझ्या हुंदक्यात ,
घालमेल झालेल्या हृदयात ..
शोधतेय मी तुला ..
हरवून बसलेल्या माझ्या विश्वात ..
हरवलेल्या माझ्या श्वासात ..
Durga mate
©®
No comments:
Post a Comment
Comments plz.