नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Jan 27, 2022

तिची ..

हा विषय जरा सांभाळून लिहिते ...

लिहावस वाटतं नव्हत पण आज जे दृश्य पाहील ते आवडल नाही म्हणून लिहिते ..


तिची शिर्षक ही पूर्ण नाही दिलं . कारण स्पेशली त्त्या विषयावर  बोलायला मलाच आवडत . तिची मासिक पाळी .


महिन्यातून चार दिवस पाहुणी म्हणून येते . आणि पाचव्या दिवशी रिटर्न जाते . धार्मिक कार्यात आली तर मग तिची तिचं मासिक पाळी अडथळा बनते ..


एवढी का ओ वाईट ती ? प्रश्न सतत मनात येतो . उत्तर सापडता सापडता जीव थकतो . उत्तर मिळतच नाही .


आज पाहिलं मी एका बाईला मासिक आलेली होती . तर ती पंगतीत जेवायला बसली नाही . बाजूला बसली एकटीच आणि तेच मला खूप खटकल . मी त्यांना म्हंटल ही " अहो , एवढं काही मानायच नाही . पूर्वी चालायचं हे सगळ आता एवढं मानायच नाही . मी तरी बिलुकल मानत नाही "


तर त्या ह्यावर फक्त हसल्या लहान आहेस   . हळू हळू समज येईल असं बोलल्या . मला तर आवडलच नाही आणि कधी आवडणार पण नाही .


ती एक नैसरगिक देणं आहे .

स्त्रित्वाची शान आहे ..

मग तिचाच का असा विटाळ ? 


इथेच माझे शब्द संपले ..


हा लेख लिहिण्यामागे कोणाचेही मन दुखावण्याचा माझा हेतू नाही

दुर्गा मते
©®

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...