नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Jan 20, 2022

ते आपल्या चांगल्या साठीचं बोलत असतात ..

हा लेख आज मी लिहितेय ह्याचं संपूर्ण श्रेय येवला सरांना जात ..आज त्यांच्याशी बोलण झाल आणि विषय सुचला ......


  शीर्षकावरून आलच असेल लक्षात थोडक्यात हा लेख मी कोणत्या मुद्द्यावर लिहिणार आहे . ते पण ;  तरीही सांगते .. कोड्यात नाही पाडणार कोणालाही ..


   आपले वडीलधारे आपल्या चांगल्याच विचार करून आपल्याला चार समजूतदारीच्या गोष्टी सांगत असतात . कधी कधी ते आपल्याला सांगतात म्हणून आपल्याला त्यांचाच राग येतो . आणि आपण त्यांनाच चुकीचं समजून जे आपल्याला हवं तेच करत असतो .


पण खर तर आपण तेव्हा चुकत असतो . आपण त्यांचं ऐकायला हव . ते जे सांगतात ते समजून घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे.  ते आपल्या भल्यासाठीच बोलत असतात.  ते आपल्याला आपल्या चुका दाखवून देतात.  म्हणून वाईट वाटून नाही घ्यायचं . उलट त्यांना thanks बोलायचं.  कारण कोणी जर आपल्याला आपल्या चुका दाखवून दिल्या . ना तर , आपण रिपेअर होतं . आपलं mind आपल्याला रिपेअर व्हायला भाग पाडत . का माहितेय ?


कारण आपल्याला चार समजूतदारीच्या गोष्टी आपल्या पेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या आपल्या वडील धाऱ्यांनी समजवलेल्या असतात ..त्यांनी आपल्या पेक्षा चार उन्हाळे आणि चार पावसाळे जास्तच बघितलेले असतात . त्यामुळे ते आपल्याला योग्य तोच सल्ला देत असतात .


  कधी कधी तो सल्ला आपल्याला नाही पटतं ..कारण बदलती विचारसरणी ....आपल्याला आधुनिक विचार भुरळ पाडत असतात.  तेच आपल्याला छान वाटतात आणि त्यांचा स्वीकार करणं आपल्याला आवडत असतं . वडील धाऱ्यांचे  विचार आपल्याला मागासलेले आणि भूरसटलेले वाटतात . पण ते तस वाटणं चुकीचं आहे.  कारण सगळेच आधुनिक विचार हे चांगलेच असतात.  असं काही नाही हे , आणि सगळेच पारंपारिक विचार हे भूरसटलेले आहेत अस नाही ..


  आपल्या पूर्वजांनी जे विचार  मांडलेत जी तत्व मांडली  ते पूर्ण विचार करूनच मांडलेली आहेत . त्यामुळे आपण त्यांचा आदर करायला हवा . आणि आता लेटेस्ट जी नव पिढी आधुनिक विचार मांडण्याचा प्रयत्न करत आहे ती पण पूर्ण पने विचार करूनच मांडण्याचा प्रयत्न करत आहे . ज्या घटना आता चालू पिरेड मध्ये घडत आहेत.  त्या चालू घडामोडींवर मांडण्याचा ती प्रयत्न करत आहे. त्यामुळे त्यातील जे विचार आपल्याला चांगले वाटतात.  त्या चांगल्या विचारांचा सुध्धा सन्मान करायला हवा .


    मी असं म्हणणार नाही तुम्ही प्रत्येक वेळेस मोठ्या व्यक्तींनी जे सांगितल तेचं ऐका . कारण ते जे सांगतील ते सर्वच बरोबर असेल असं नाही ना . आणि त्यांचे विचार तुम्हाला पटतीलचं अस ही काही नाही.  प्रत्येक जण ज्याला जी तत्व आवडतात त्या तत्वानुसार आपल्याला समजवण्याचा प्रयत्न करत असतात . जे आवडल ते घ्यायचं नाही आवडल सोडून द्यायचं .


कधीच मीच खरा आणि मी मांडलेली तत्वचं खरी अशी ही भावना मनात नाही ठेवायची . कारण आपण मांडलेली तत्व ही समाजाच्या दृष्टीने पण बरोबर असायला हवी . ती समाजाने स्वीकारायला पण हवी . ते पण खूप महत्वाचं आहे . आणि आपले वडीलधारे हेच आपल्याला समजवण्याचा प्रयत्न करत असतात . हे आपण सर्वात आधी समजून घ्यायला हवं ..म्हणजे आपल्याला कोणी आपल्या चुका दाखवून दिल्या तर जास्त वाईट नाही वाटणार ..


  सांगायचा मुद्दा एवढाच आपले वडील धारे हे आपल्याला आपल्या  चांगल्याचाचं विचार करून  समजावत असतात ..ते बोलता बोलता जास्तीच बोलून गेले तर , वाईट नाही वाटून घ्यायचं . त्यांचा हेतू हा आपल्याला दुखावन नसतो तर , आपल्या हातून परत तीच चूक होऊ नये हा असतो . जेवढ पटलं तेवढं घ्यायचं.  पण कधीच कोणाचाही राग नाही ठेवायचा .  मनात राग ठेवून परत तिचं चूक करण ह्याला म्हणतात अहंकार तो आयुष्य बरबाद करण्याचं काम करतो. 


प्रगती तर होतच नाही पण अधोगती मात्र शंभत टक्के होते ...


अधोगती होऊ नये असं वाटत असेल तर , वडीलधाऱ्यानी सांगितलेल्या गोष्टी ऐकाव्या ...आयुष्याचे सोने होईल ..

  हा लेख मी कोणाचेही मन दुखावण्याचा माझा हेतू नाही.
चुकीस क्षमस्व ..
Written by - durga mate ..


No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...