नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Jan 20, 2022

उद्यासाठी आज जगतोय

आनंदाचा एकमात्र क्षण शोधतोय ,


माझे सर्व दुःख लपवण्याचा प्रयत्न करतोय ....


अग्नीच्या निखाऱ्यावर मी चालतोय ..


अनुभवाच्या तप्त ज्वालामुखीत मी तपतोय ..


अंगणी बहरलेला मोगरा सुकताना मी बघतोय ..


रोज तो बहरावा म्हणून त्याला खतपाणी घालतोय ..


सांज वेळी सुर्य ढळताना रोज मी बघतोय ..
ओंजळीतील निराशा त्याला अर्पण करतोय ..

धावत्या ट्रेनमध्ये रोंज मी चढतो य  ..
चार दिवस सुखाचे बघण्यासाठी घाम घालतोय ..

दीन रात मी मेहनत करतोय ...
आयुष्याच्या संध्याकाळी अगंनी सुख बरसाव ..
म्हणूनच आज मरमर करतोय ..
Written by - durga mate


No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...