नित्या आज खूप लवकर उठली होती . म्हणन्यापेक्षा तिला काल रात्रभर झोपच आली नव्हती . कारण ती ह्या आधी कधी एकटी राहिलीच नव्हती . पहिली वेळ ती एकटी राही ली होती .
ती पाच वाजताच उठली होती . आणि एकटीच काम असल्यामुळे आठ वाजेपर्यंत तिचं पूर्ण काम आवरलं होतं. काम आवरल्या नंतर काय करावं सुचत नव्हतं. एवढ्या मोठ्या फ्लॅट मध्ये एकटीने च काय भिंतीला बोलायच का ? असं स्वतःशीच बोलायची . तिला ती एकटीच राहत होती . ह्या गोष्टीची खूप चीड यायची .
वेळ जावा म्हणून टिवी ऑन केली . तर त्यातही कोणताच चांगला कार्यक्रम लागत नव्हता .
तेवढ्यात दरवाजावर कोणी तरी बेल वाजवली . " कोण असेल एवढ्या सकाळी " ती विचारात पडली . परत दरवाजावर उभ्या असणाऱ्या व्यक्तींनी बेल वाजवली .
हिने दरवाजा ओपन केला ..
" तू !!!"
त्याला बघून ती खूपच खुश झाली ..
आणि तो ही तिला एवढ्या दिवसांनी बघून खूप खुश झाला .
" हो ..मीच . काल ठरल होतं . पुणे दर्शन . विसरलीस ."
राहुल तिची फिरकी घेत घेत बोलला ..
" नाही रे . असं काही नाही . एवढ्या सकाळी सकाळी येशील . असं वाटलं नव्हत . बर आत तर ये ." असं म्हणत ती त्याला एक फ्रेंडली मिठी मारते ..
" हो आलोच " अस म्हणतो तो हातात असलेली बॅग घेऊन आतमध्ये येतो . घरातील डेको रेशन बघून
"वाव ! खूप छान सजवल घर ."
" Hmm मी आणि शेखर ने मिळून सजवल " नित्या त्याला घर दाखवत बोलली ..
" तू बसतो स की फ्रेश होतोस ..मी तोपर्यंत चहा आणते आपल्यासाठी .." नित्या ..
" मी फ्रेश होतो . तू तो पर्यंत चहा बनव छान मग आपण लगेच पुणे दर्शन घ्यायला निघू .." राहुल
" आणि खायचं नाही का काही . भूक नाही लागली का तुला किती दूर वरुन आलास .." नित्या
" नाही ग चहा घेऊन निघू आपण . बाहेर गेल्यावर काय बिना खाल्या पिल्याचं राहणार आहोत का ? " राहुल
नित्या जराशी गोंधळली . " ओके मी बनवते चहा ती . बघ ती समोर बेडरूम आहे . आणि त्या मध्येचं वॉश रूम आहे . तू ये फ्रेश होऊन .." अस म्हणत नित्या किचन मध्ये गेली ..
राहुल ही फ्रेश होण्यासाठी गेला . रूम इतकी छान सजवली होती . की कितीतरी वेळ तो ती रुम बघतच राहिला . थोड्या वेळाने फ्रेश होऊन बाहेर आला . तो पर्यंत नित्या ने ही छान गरमा - गरम अद्रक - विलायची घालून चहा बनवला होता ..
दीर्घ श्वास घेत ." Wow ! चहा तर खूप छान वास येतोय"
असं म्हणत त्याने चहा चा कप उचलून तोंडाला लावला .
आणि चहा घेतला.
" Wow ! खूपच छान झाला आहे. चहा ..असा चहा मी आयुष्यात पहिली बारं . पिलो असेल . " राहुल तो चहा पीत पित बोलला ..
नित्या ही मान हलवत " हो का ? नका झाडावर चडवू घ्या लवकर पिऊन असं म्हणत तिचा कप घेऊन ती किचन मध्ये जाते .
राहुल चा ही मग चहा पिऊन होतो . तो ही किचन मध्ये जातो .
" अरे , हे काय राहुल . मला आवाज द्यायचा ना तू कशाला आणलास कप .." नित्या त्याच्या हातातील कप घेत बोलली .
" का मला तुझ किचन दाखवायचं नव्हत का ? " राहुल तिच्यावर चिडत बोलला .
नित्या त्याच्या बोलण्यावर हसली . " राहुल अस काही नाही रे . किचन सारखं किचन आहे माझं . तू गेस्ट आहेस ना माझा म्हणून बोलले . वेडा बघ पूर्ण किचन तो पर्यंत आलेच मी change करून .."
असं म्हणत ती बेडरूम मध्ये गेली .
छान वनपिस घालून वैगरे रेडी झाली . आणि बाहेर आली . तिला एवढ्या सुंदर लुक मध्ये पाहून राहुल एकदम हरवून गेला .
" खूप छान दिसते . " नकळत बोलून गेला .
" थँक्यू ..चल आता ." असं म्हणत ते निघाले बाबा एकदाचे पुणे दर्शन करायला ..
बघू पुढच्या भागात काय काय मजा येते . ते पुण्यात त्या दोघांची ..
पुढील भाग लवकर ..
No comments:
Post a Comment
Comments plz.