नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Jan 12, 2022

आता जरा जगून बघते स्वतः साठी

आता जरा जगून बघते स्वतःसाठी ..
खळखळून हसण्यासाठी ..
काळोखात गेलेले दुःख विसरण्यासाठी ..

आयुष्याचे रंग बघण्यासाठी..
उमलेल्या फुलांचा सुगंध घेण्यासाठी . 
नाजूक  मनाचं गोड व्यक्ती महत्त्व होण्यासाठी . 
आता जरा जगून बघते स्वतः साठी ..

माणुसकीचा ओलावा जपण्यासाठी ,
कुरूप विचार नष्ट करण्यासाठी ..
सुंदर विचार मनी रुजवण्यासाठी ..
आता जरा जगून बघते स्वतः साठी ..

स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी....
आयुष्य नेटाने जिद्दीने , चिकाटीने जगण्यासाठी ..
एक आदर्श व्यक्ती होण्यासाठी ...
आता जरा जगून बघते स्वतः साठी ..

Written by - durga mate 



No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...