नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Jan 12, 2022

त्यानेच तर लिहिलं ..

पृष्ठावर केली जातात उत्तरे चिन्हांकित ,
आपले भविष्य सुद्धा आहे यावर अंकित ..

असं म्हणतात ,
की देवाने आपलं नशीब जन्मापूर्वीचं रेखाटलं ,
त्याच्या हुकुमावरचं आपलं जीवन चालतं ..

काय खरं काय खोटं माहीत नाही ..
खरं खोटं करण्यात मला इन्ट्रेस नाही ..
कारण जाणते मी हाती काहीचं लागणार नाही ..

नशिबाचा खेळ हा ..
त्याच्या भाकितावरच चालणार ..
त्याने जे लिहून ठेवलं तेच हातून घडणार ..

सुख - दुःख , आसू आणि हसू ,
सगळ त्यानेच दिलं ..
बदल्यात काहीचं नाही मागितलं ..
 देह - आणि आयुष्य हे त्यानेच तर दिलं ..
त्या ईश्वराने ..सृष्टी निर्मित्याने ..

आयुष्याच्या पृष्ठावर सारचं त्याने लिहिलं ..
शेवटच्या श्वासाचं गुपित मात्र स्वतः कडे राखून ठेवलं ..
Written by - durga mate 





2 comments:

  1. सुंदरच.....खुप छान लिहिलं आहे 👌👌👌

    ReplyDelete
  2. क्या बात है सुंदर रचना

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...