नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Jan 13, 2022

दिवसच होते ते न्यारे ...

प्रत्येक नव्या गोष्टी छान असतात ,
पण जुन्याच आठवणी मनाला छान वाटतात ..

बालपणीच्या बंधन मुक्त आयुष्याच्या ..
ज्या कधीच नाही जाणार पुसल्या ...

ना ओझ होतं जबाबदाऱ्यांच ,
ना दडपण होतं कोणी टोमणे देईल याचं ..
खरचं जगणं होतं ते न्यारचं ..
नेहमीच हवं हवंस वाटणारं ..

जाई जुई मोगरा गुलाब ,
ह्यांच्याशी तर होतीच मैत्री ..
पण अजबचं ना ..
चिखल - माती हे तर आवडीचे होते राजे ..

खरचं दिवसच होते ते न्यारे ,
मनातून कधीच न हरवणारे ,
कायम स्वरुपी आठवणीत राहणारे ..
Written by - durga mate

2 comments:

  1. खूपच सुंदर अप्रतिम लिहले

    ReplyDelete
  2. खूप सुंदर रचना 👌👌👌

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...