नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Jan 13, 2022

लॉक डाऊन नंतरची लव्ह स्टोरी

ऊर्मी आज सकाळपासून लस घेण्यासाठी गेली होती . 
आईने तिला अनेकदा सांगितल . "  जाऊ नकोस  तुला लस मिळणार नाही . कारण तुला 18 पूर्ण व्हायला कंप्लीट 1 महिना बाकी आहे . "

पण ऊर्मी हट्टी तिच्या मनात जे असेल ,  तेच ती करायची. 
ती गेलीस शेवटी लस घ्यायला . दोनदा नंबर येऊन ही तिला लस दिली . उन्हात तिच्या जीवाची ल्हाई ल्हाई झाली होती . त्यामुळे ती खूपच संतापली होती . 

मागे उभी असणारी ऊर्मी समोर येऊन लस देणाऱ्या व्यक्तीवर चांगलीच  बडकली आणि तिने तिच्या तोंडाचा पट्टा सुरू केला . 
" ओ सर ,  मला लस द्या की ..किती वेळ झाला . मी 
लाईन मध्ये नुसतं वेड्या सारखी उभी आहे . माझ्या पाठीमागून आलेल्या लोकांना तुम्ही लस दिली.  आणि माझ्याकडे साधं बघत ही नाही आहात . अशी कुठली तुमची वागण्याची पद्धत ? "  

तिच्या अश्या बोलण्यावर समोर असणारा व्यक्ती काही बोलणारच तर समोरून एक पोलिस ऑफिसर आला .
दिसायला एकदम हॅण्डसम कोणतीही मुलगी सहज त्याच्यावर भालेल . बोलण्यात ही खूप टॅलेंट .. तो ऊर्मी ला समजावू लागला ..

  " Exuse me mam ..तुम्हाला लस मिळणार नाही ." 

" पण का ? " ऊर्मी उंच आवाजात बोलली .

" अहो तुमचं वय नाही बसत.  "  तो i.p.s ऑफिसर तितक्याच समजूत दारिने बोलला ..

" अहो बसत ना . पुढच्या महिन्यात मला 18 पूर्ण होणार ."
ती बोलली.  

" अहो मग पुढच्या महिन्यात पण डोस येणार . तेव्हाच घ्या ना तुम्ही . " I.p.s ऑफिसर .

" आता काय प्रोब्लेम " ऊर्मी जिद्दीने बोलली .

" आता मिळणार नाही .". I.p s ऑफिसर 

" पण का ? " ऊर्मी .

" पुढच्या महिन्यात मिळणार " i.p.s ऑफिसर .

" ओके . पण मला कोण सांगणार डोस आला ते .." ऊर्मी उंच आवाजात बोलली .

" मी सांगतो ." I.p.s ऑफिसर 

" हो ..खरच ..मोबाईल नंबर द्या ." ऊर्मी ..

" काय ? " I.p.s ऑफिसर 

" मोबाईल नंबर .." ऊर्मी 

ऊर्मी एवढी जिद्दीला पेटली होती . की शेवटी त्या पोलीस ऑफिसर ने तिला आपला मोबाईल नंबर दिला . 
ती thanks बोलून निघणार तेवढ्यात ..ती thanks बोलल्यानंतर काळजी घ्या .  अस बोलल्यावर त्याने तिला सहज विचारलं .." काळजी का घेऊ .." 

ती चिडून बोलली .." मग आजारी पडा ..आणि कोणाच्याही प्रेमात पडणार नाही . ह्याची काळजी घ्या .
विशेष करून माझ्या .." हे शब्द तोंडातून बाहेर पडत नाही . तर तिने तिथून धूम ठोकली . पोलिस ऑफिसर ला तिचा बोलण्याचा हेतू समजला तेव्हा ती किती तरी दूर गेली होती . तो पोलीस तिच्यावर हसला आणि तिला त्याचे बोल ऐकू जाईल . एवढ्या उंच आवाजात बोल ला .

" अहो तुमच्या बोलण्याचा मी नक्की काय अर्थ घ्यायचा ."

तिच्या कानावर त्याचे बोल पडले होते . तिनेही उंच आवाजात रिप्लाय दिला .
" तुम्हाला जो अर्थ घ्यायचा आहे तो घ्या.  
ती हसत ही हसत घरी गेला . आणि तो ही हसत हसत घरी गेला ..

Love at first sight होतं ते ....

तिने नंबर तर घेतलाच होता . मग तो नंबर save केल्यानंतर सुरू झाला एका सुंदर नात्याचा प्रवास. मैत्री झाली . हळू हळू बोलण वाढल कॉलिंग वर ही बऱ्याचदा बोलण झालं. एकमेकांबद्दल आकर्षण ही वाढलं. आणि आला पुन्हा दुसरा डोस . ज्या दिवशी दुसरा डोस आला. 
नेमका त्याच दिवशी उर्मीचा वाढदिवस आला . 

I.p.s ऑफिसर ने सकाळीच तिला कॉल करून सांगितल . " आज लस मिळणार आहे . आणि पहिला नंबर तुझाच बर का ? " आणि त्याने फोन कट केला .

तिचा birthday होता . मग काय birthday girl काय कमी छान दिसणार का ? आई वडील घरी नसल्याचा तिने चांगलाच फायदा घेतला . छान रेड कलरची साडी घातली . केस मोकळे सोडले. ओंठावर डार्क लिपस्टिक लावलं . खुपचं छान दिसत होती ती त्या लुक मध्ये ...

ती गेली लस घ्यायला ..गर्दी कमी असल्यामुळे त्या पोलीस ऑफिसर ची नजर सहज तिच्यावर गेली . तिला त्या तशा लुक मध्ये पाहून त्याचा बीपी हाय झाला . तो चक्क पाच मिनिट नुसत तिच्याकडेच बघत होता ...

शेवटी हिचं गेली त्याच्याकडे. आणि त्याला जाऊन बोलली .
" ओ. काय बघता असा . ह्या पूर्वी काय मला पाहिलं नाही का ? " 

" पाहिलं होतं ना ..पण एवढ्या सुंदर लुक मध्ये आज पहिली बार बघतोय ना .." तो तीच्यकडे एकटक बघतच बोलला ..

तिला तर त्याच फार हसू येत होतं. " हो का ? घ्या मग बघून जेवढं बघायचं आहे . तेवढं बघून घ्या आज " 

त्याला कधाचित ती काय बोलली ते कळलंच नव्हत .तो बोलून गेला ." हो तेच तर करतोय " 

तो असं बोलल्यावर तर तिला त्याच जाम हसू आलं . एवढं
आलं की ते तिला कंट्रोलच नाही झालं .तिच्या हसण्याचा जेव्हा त्याला आवाज आला . तेव्हा कुठे तो भानावर आला ..

" काय ग काय झालं ? का हसतेस ? " तो विचारू लागला .

" काही नाही . मी आलेच लस घेऊन ." असं म्हणत ती हसत हसतच लस घ्यायला गेली .

तेवढ्यात त्याच्याकडे एक मुलगी गुलाबाची परडी घेऊन . 
गुलाब विकणारी चिमुरडी मुलगी आली . 
" दादा फुल घ्या ना " अस म्हणत ती त्याला विनवणी करत होती . त्याने गुलाबाचे खूप सारे फुल घेऊन त्याचा एक छानसा गुश्चा तयार केला . आणि त्या चिमुरडीच्या परडीत चार ते पाच हजार रुपये ठेवले . हे सारं दृश्य ऊर्मी दुरूनच बघत होती . 

ती चिमुरडी निघून गेली . आणि ऊर्मी ही लस घेऊन आली . तो तिला विचारू लागला .." घेतलीस का लस "
" हो घेतली " कापसाने लस घेतलेल्या जागेवर चोलत ऊर्मी बोलली ..

" त्रास होतोय का खूप " तो काळजी ने बोलला ..

" नाही .." ती हसतच बोलली ..

तो तिच्या समोर गुढग्यावर टेकून उभा राहिला .आणि हातात असलेले गुलाबाचे फूल घेऊन तिला प्रपोज करू लागला . 
तिने ही आनंदाने ते फुल घेतले . आणि त्याला एक घट्ट मिठी मारत ती बोलली .." म्हंटले होते ना प्रेमात पडशील ."
असं म्हणत ते दोघेही खूप हसले . आणि एकमेकांना मनापासून त्यांनी आपलं मानल.

कशी वाटली ही लॉक डाऊन नंतरची लव्हस्टोरी . कॉमेंट करून नक्की सांगा.  



No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...