खऱ्या मैत्रीवर विश्वास राहू दे ,
मैत्रीचे हे नाते अनंत राहू दे ...
मैत्रीचे रुपांतर जरी नाही झाले प्रेमात ,
तरी नको दुरावा येऊ देऊ आपल्यात.
मैत्री ही अशीच बहरत राहू दे ...
जो पर्यंत तुझा - माझा शेवटचा श्वास भेटीला येत नाही ..
तोपर्यंत मैत्री ही तोडायची नाही ...
जग घेईल आक्षेप ह्या मैत्रीवर ..
उडवतील शिंतोडे तुझ्या - माझ्या चरित्रावर ..
तरी डगमगुन जावू नकोस मित्रा ...
मान्यच नाही रे ह्या जगाला ..
एक स्त्री आणि एक पुरुष ..
फक्त एक चांगले मित्र - मैत्रीण असू शकतात ...
Written by - durga mate
खूप सुंदर रचना 👌👌👌👌
ReplyDeleteखूपच सुंदर रचना 👌👌👌💐💐💐
ReplyDeleteखुप सुंदर रचना 👌👌👌✍️✍️
ReplyDeleteअतिशय सुंदर...
ReplyDeleteसुंदर व्यक्त झालीस
ReplyDelete