राहुल ने त्याच्या फ्रेंड ची फोर व्हीलर आणलेली होती . ते दोघे ही त्या फोर व्हीलर मध्ये बसतात . राहुल गाडी 75 च्या स्पीड ने चालवतो. आणि एकदम रोमँटिक साँग्ज लावतो ..
पहला नशा है !
पहला घुमा ..
नया प्यार है .. नया इतंजार ..
कर लू में क्या अपना हाल ..
ये , दिलं है बेकरार ..
हे गाणं सुरू असताना . राहुल गाडी चालवत असताना समोर बघायचं सोडून . एकसारखं नित्याक डेच बघत होता . कधी डोळे लावत लावत तिच्यावर लाईन मारायचा तर कधी अलगद तिच्या ओंठापाशी आपले ओठ नेत हुलकावणी द्यायचा . आणि हसायचा ..
तिला त्याच्या तशा वागण्याचं खूप हसू ही यायचं आणि भीती ही वाटायची .
" राहुल काय चाललय तुझ ? समोर बघून नीट गाडी चालव ." ती त्याला म्हणाली ..
तो तिच्याकडे तिरक्या नजरेने बघत .." मला समोर बघण्याची गरज नाही . "
" हो का ? मग आपल्याला रस्ता कसा कळणार नक्की जायचं कोणत्या दिशेने ." नित्या त्याला चिडवत विचारू लागली ..
राहुल तिच्या खूप जवळ जाऊन तिच्या डोळ्यात डोळे घालून बोलू लागला . " मला तुझ्या डोळ्यात प्रत्येक रस्ता दिसतो .."
नित्या त्याच्या बोलण्यावर हसली आणि म्हणाली , " वेडा माझा मित्र चालव नीट गाडी .."
आणि मग त्याच्याकडे लक्ष न देता ती तिच्या मोबाईल मध्येचं लक्ष द्यायला लागली ..
थोडा वेळ असच चाललं आणि राहुल ने एकदम गाडीची स्पीड वाढवली आणि अचानक गाडी थांबवली .
आता जराशी ती घाबरली . तिने त्याच्यावर पाठीवर एक नाजूक थाप ठाकली . आणि जरा चिडून बोलली .
" राहुल काय प्रकार आहे हा ? कोणती पद्धत आहे ही गाडी चालवण्याची . आणि इथे थांबवली का ? "
तो तिचा एवढा घाबरलेला चेहरा पाहून खूप हसला . तिची बोलण्याची स्टाईल जरा खूपच बदलली होती.
" माझी आई थांबायचं आहे आपल्याला म्हणून गाडी थांबवली .."
" इथे काय आहे स्पेशल ..? " नित्याने त्याला विचारले ..
" स्पेशल काही नाही ग ..ते बघ कॉफी शॉप ..कॉफी घेण्यासाठी थांबायचं आहे .." नित्या कॉफी शॉपच्या दिशेने चालत बोलला ..
नित्या मग काही न विचारता त्याच्यामागे चालू लागली . त्यांनी कॉफी वैगरे घेतली आणि पुन्हा निघाले आपल्या पुढच्या मुक्कामी . नंतर ते एका भव्य - दिव्य मॉल मध्ये फिल्म बघण्यासाठी गेले . 11 ते दीड फिल्म बघितली . दुपारी जेवण्यासाठी छान हॉटेल मध्ये थांबले . जेवण वैगरे झाल्यानंतर एका गार्डन मध्ये गेले. त्या गार्डन मध्ये
खेळायला खूप काही होतं . लहान मुलांना ते यंग माणसांना खेळता येईल असे खेळ तिथे होते ..
ते आकाश पाळण्यात बसले . दोघेही खूप खुश होते . आजचा त्यांचा दिवस त्यांच्या आयुष्यातील सर्वांत सुंदर दिवस होता.
" राहुल , किती लकी आहोत ना आपण . लग्न न करता सुद्धा आज किती छान मैत्री आहे . आपल्यात ..ही मैत्री अशीच असू दे प्लीज ..शेवट पर्यंत . जसे शेखर आहेत ना साता जन्मासाठी ..तसाच तू रहा मित्र माझा साता जन्मासाठी." असं म्हणत ती त्याला मिठी मारते ..
" Hmm " करत तो ही तिला प्रतिसाद देतो ..
बराच वेळ झालेला असतो . संध्याकाळचे पाच साडे पाच वाजले असतील ..ते पुन्हा एका खूप मोठ्या मॉल मध्ये जातात . तिने एवढं मोठं मॉल आयुष्यात पहिलीच बारं पाहिलेलं असतं ..
" किती मोठं आणि किती सुंदर मॉल आहे ना " नित्या त्याला म्हणाली ..
" Hmm " तू हसताना खूप गोड दिसते .." राहुल
" थँक्यू " नित्या ..
राहुल ने तिला एक साडी गिफ्ट केली . आणि नित्याने ही त्याला तिच्या चॉइस चा ड्रेस गिफ्ट केला . त्यांनी पूर्ण मॉल पाहिला . शॉपिंग ही केली ....फिरत फिरत असताना अचानक राहुल आणि नित्याचा हात एकमेकांच्या हातातून सुटल आणि ते दोघेही एकमेकांना दिशे नासे झाले . नित्या राहुल ला शोधत होती . राहुल नित्याला रेंज प्रोब्लेम मुळे कॉन्टॅक्ट होतं नव्हता. नित्या खूप घाबरली होती . एवढी की शेवटी ती रडायला लागली. तेवढ्यात तिच्या कानावर काही वाक्य ऐकु आले ..
" नित्या तुम्ही जिथे ही कुठे असाल , तिथून प्लीज वेल कम गेट कडे या . राहुल आपली वाट बघत आहे .."
ते वाक्य कानावर पडताच नित्या हातात असलेल्या पिशव्या सांभाळत त्या गेट कडे पळते . आणि जाऊन त्याला घट्ट मिठी मारते ..
" काय राहुल ये . घट्ट हात पकडायचा की ..अशा गर्दीत एकटं सोडलं मला .." ती खूपच घाबरली होती . तिच्या बोलण्यातून जाणवत होत .
" किती घाबरते स. एवढं घाबरन बरं नाही . " तो तिला जवळ घेत बोलला ..
" नवीन शहर असल्यामुळे वाटते थोडी भीती .."
आणि ते बिल पे करुन बाहेर पडतात ..
" आता आपण हॉटेल मध्ये जावून जेवून करू आणि मग घरी. " राहुल
" नको आता कुठे डायरेक्ट घरीच जावू. " नित्या
" का ? " राहुल
" नको रे प्लीज ..खूप थकले मी .." नित्या
" ओके मग पार्सल घेऊ .."
" Hmm " म्हणत तिने थोडीशी स्माईल दिली ..
क्रमशः
पुढील भाग लवकर ..
No comments:
Post a Comment
Comments plz.