विषय तसा नाजूक आहे . प्रत्येकाच्या हृदयाचा ठोका चुकवणारा आहे .
खूप जीव घेणं असतं ,
एखाद्या मध्ये गुंतण ,
गुंतून पुन्हा त्याच्यापासून वेगळं होणं ..
ज्याच्यासाठी आयुष्य जगायचं होतं ..
त्याला कायमचं विसरून जाणं ..
खरच खूप अवघड असतं ..
पण गुंतण्याची भीती वाटते ..
म्हणून एखाद्या मध्ये गूंतन सोडून द्यायचं का ?
जो आवडतो त्याच्यापासूनचं दूर पळायचं का ?
मला तरी हे चुकीचं वाटत . जस आपण एखाद्या मध्ये गुंतू शकतो . तशीच कधी परिस्थिती आली तर , ज्याच्या मध्ये गुंतलो होतो त्याला विसरता येतंच की , थोडा त्रास होतो पण तो , ही खूप काळ टिकणारा नसतो ..
जो गुंतला त्याला ही ज्याच्यात गुंतला त्यालाही त्रास होतो . जेव्हा ..एकमेकांना पासून वेगळा होण्याचा निर्णय घ्यायचा असतो . पण ठीक आहे ना ..ज्याच्यात जीव अडकला होता. त्याच्यापासून दूर जाताना थोडा त्रास तर होणारच ना ...
आपण एक एकमेकांची काळजी करत असतो . ह्याला माझी किती सवय झाली होती . कसा राहील तो माझ्याशिवाय . पण अशक्य असं काहीच नसत . सगळं शक्य होतं हळू हळू एकमेकांशिवाय जगता ही आणि जगवता ही येत . आणि त्याला विसरता ही येत.
सगळ शक्य असतं फक्त थोडा वेळ जाऊ द्यावा लागतो..
आपण ज्याला विसरलो तो ही हळू हळू आपल्याला विसरायला लागतो . तो bussy होतो आणि खुश राहतो. आणि आपण ही आपल्या आयुष्यात bussy होतो आणि खुश राहतो . सगळ्या गोष्टी सुरळीत चालू असतात . काहीतरी निसटून गेलं हा भास ही कालांतराने नाही होतं .
गुंतन्याची भीती वाटते म्हणून , एकमेकांपासून दूर नाही पळायचं ..जो पर्यंत शक्य आहे ..तो पर्यंत नातं निभवायच ....आणि अशक्य वाटलं तर मग थांबायचं . थांब न्याआधी एकदा ज्याच्यात आपण गुंतत चाललो , त्याच्या डोळ्यात डोळे घालुन स्वतःला विचारायचं . खरच इथे थांबन गरजेचं आहे का ? आणि आता इथे थांबन योग्य तरी आहे का ?
Written by - durga mate ..
No comments:
Post a Comment
Comments plz.