तूच आहेस मला नेहमी हसवणारी ,
तूच आहेस माझ्या स्वप्नांना जागवणारी ..
माझ्या नाजूक पंखांना बळ देणारी ..
इवल्या इवल्या मनावर योग्य संस्कार देणारी ..
माय माउली माझी माझी आई ..
चुकले कधी तर ,
कान पकडून एक फटका देणारी ,
कुशीत घेऊन , अस वागू नये ,
बाळा सतत समजवणारी ..
माय माउली माझी माझी आई ..
माझ्या सोबत खेळणारी ,
भातुकलीचा डाव आखणारी ..
खळखळून मला हसवणारी ..
तर कधी रडवणा री .
पुन्हा कुशीत घेऊन ,
पाठीवरून मायेने हात फिरवणारी
माय माउली माझी .माझी आई
Written by - durga mate
No comments:
Post a Comment
Comments plz.