त्याला बघताच ...
निशब्द शब्द बोलके होतात ..
गालावर लाली चढते ..
एक अनामिक ओढ साद घालते ..
ह्या कोवळ्या मनाला ...
पहिल्या भेटीची ..पहिल्या प्रेमाची ..
जादूच न्यारी ...
शब्दात सांगता येईल की नाही माहीतच नाही ...
कोणतीही मुलगी जेव्हा प्रेमात पडते . तेव्हा जगते कमी आणि कल्पनेत रंगते जास्त . ती स्वतः शिच बोलायला लागते . त्याचा चेहरा आठवला की मग मनातल्या मनातच हसायला लागते . सतत त्याच्याशी बोलण्याची आस तिला असते . सतत त्याचा चेहरा बघावासा वाटतो.
मोबाईल फोन मध्ये जेव्हा एखादं रोमँटिक गाणं लागलं . तर हे गाणं कोणीतरी आपल्यासाठीच खास लिहिलंय अस ही वाटायला लागतं. खरच जेव्हा ही कोणी व्यक्ती प्रेमात पडतो ना तेव्हा हे जग , सत्य कमी आणि भास अधिक वाटायला लागतो .
खरच वेडेपणाचे दिवस असतात ते काहीचं ठाऊक नसतं. ज्याच्यावर जीव जडला तो व्यक्ती आपल्या हक्काचा होईल की नाही . पण तरीही काही क्षण का होईना त्याच्यासोबत त्याच्यासाठीच जगावस वाटतं .
कारण त्याच्यावर आपण निस्वार्थ प्रेम केलेलं असतं . कोवळ्या वयात कुठल्याही स्वार्था शिवाय तो आपला कोणीच नसताना त्याला आपण आपल सर्वस्व मानलेल असतं ..
मुलांचं ही तसचं असतं . एखादी मुलगी आयुष्यात आली की तिच्याशिवाय ह्या जगात दुसर कोणीही स्पेशल नाही असच वाटायला लागतं . तिच्यामुळेच सिनेमा बघण्याचा छंद जडतो....अजुन बरच काही घडत अनेक चांगले वाईट बदल घडतात ..
मी एवढंच लिहू शकते कारण मी अजुन तरी कोणाच्या ही प्रेमात नाही पडले ...जेव्हा पडेल ना तेव्हा खूप छान लेख लिहिन पुन्हा ..
काही कमी जास्त झाल असेल तर क्षमस्व ...
Written by - durga mate
वाह..खूपच सुंदर लिहिलंय 👌👌👌👌💐💐💐
ReplyDeleteओके ठीक आहे यापुढे आता मी लिहिणार 😁😁😁 कारण मी पण प्रेमात पडले होते आणि आज त्याचाच संसार पण करत आहे.🤗🤗🤗
ReplyDeleteहो ये जो पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त पण आतापर्यंत ची स्टोरी तू खूप सुंदर आणि अप्रतिम रित्या लिहिलीस शोना 👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍✍️✍️✍️✍️✍️✍️✍️💐💐💐💐💐💐🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🌹🌹🌹🌹🌹🌹
खरच जे वर्णन केल ते खूपच अप्रतिम होत
ReplyDeleteखूप सुंदर लिखाण 👌👌👌👌
ReplyDelete