आज हवे हवे से वाटू लागले ..
धरणी वर पाय आज रुळेनासे झाले ...
उडत्या पाखरां वाणी ..
आज उंच झेप घ्यावी वाटू लागली ..
काहून , कनु आज ..
धरणी माय पोरकी वाटू लागली ..
आभाळाची छाया साद घालू लागली ,
हिरवळ जमिनीची आज नकोशी झाली ..
आकाशाला गवसणी ,
घालायची धडपड उरी दाटली ,
मला आज अभाळाला ,
गिरट्या घालायची ओढ लागली ...
Written by - durga mate
No comments:
Post a Comment
Comments plz.