नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Jan 16, 2022

फ्युचर नसलेली नाती चुकीची नसतात ..

आजचा माझा विषय आहे . फ्युचर नसलेली नाती ...

 अशी काही नाती असतात की , त्या नात्यांना आपल्या नात्याच नक्की फ्युचर काय हेच माहित नसतं . 

..उदाहरण घ्यायचं झालं तर प्रेम ...हे नातं आपण घेऊ . 
वय - जात - गरीब - श्रीमंतीची दरी न बघता केल्या जातं ते प्रेम जगातील सर्वात सुंदर नातं .  कोणत्याही वयात कोणावरही होऊन शकत . मग  त्या नात्याचं नक्की 
 फ्युचर काय तेचं माहीत नसतं . मग ते नातं चुकीचं असतं का ? 

ह्या प्रश्नाच्या ठिकाणी मन थोडस अडखळल . आणि लिहावंस वाटलं . फ्युचर नसलेल्या नात्याबद्दल थोडंसं मनात साचलेल ...जर गरजेपेक्षा जास्त परखडपणे आणि नकळतपणे चुकीची मत मांडल्या गेली तर त्यासाठी मनापासून माफी मागते ..

  फ्युचर नसलेली जी नाती असतात . खरं तर तिचं जिवाभावाची असतात . नात्याला योग्य ते फ्युचर नाही . 
म्हणून जोडलेलं नातं.  लगेच तोडण अजिबात बरोबर नाही .

 जग काय म्हणेल ह्याचा विचार करत , आयुष्य जगायचं असेल ना तर , मग पाच पाच मिनिटाला आपल्याला आपली मतं बदलावी लागेलं . पाच मिनिट घोड्यावर आणि पाच मिनिटानंतर पायी चालावे लागेल . कारण जग हे " ना घोड्यावर बसू देत , ना पायी चालू देत . " 

त्यामुळे 75 पर्सेंट मनाप्रमाणे जगायचं . 25 पर्सेंट हे जग काय म्हणेल ह्याचा विचार करत जगायचं . कारण पूर्णपने आपण प्रत्येक वेळेस बरोबरच असू अस नाही , ना म्हणून जगताना थोडंसं सामाजिक भान असणं पण गरजेचं असतं ..

तर मी पुन्हा मुद्द्यावर येते . प्रत्येक नात्याला  फ्युचर असायलाच हवं हे गृहीत धरून कोणतेही नातं प्लीज जोडू नका . कारण कोणतच नातं हे नशीब घेऊन जन्माला येत नाही  की , त्या नात्याला योग्य फ्युचर असेलचं ...आणि योग्य फ्युचर नाही म्हणून लगेचच जोडलेलं जिवाभावाच ते गोड नातं तोडू पण नका . 

ते नातं शेवट पर्यंत तितक्याच जबाबदारीने निभवा . केवळ नात्याला फ्युचर नाही . म्हणून जर नातं तोडल ना
तर , खूप त्रास होतो . 

ज्याला  ते नातं आता नको असतं त्याला पण ; आणि ज्याला ते नातं हवं असतं त्याला पण ..खूप त्रास देणारा असतो तो क्षण ..तो क्षण कोणाच्याही आयुष्यात न आलेलाच बरा . जिथे तुम्हाला वाटतं .. आपण हे नातं पुढे नेऊ शकतो . ह्या नात्याला योग्य ते नावं देऊन एक चांगलं फ्युचर देऊ शकतो . तिथे तुम्ही त्या नात्याला योग्य ते फ्युचर देण्याचा जरूर प्रयत्न करा . ते नातं जोडण्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ..

पण ; मला हे नातं तोडायच आहे . नको आता मला हे नातं.  खूप झालं इथे गुंतण , काय फायदा इथे गुंतून . इथेच थांबायला हवं आता ..जेव्हा तुम्हाला असं वाट्टेल ना , तेव्हा मात्र प्रामाणिकपणे एकदा नाही . हजारदा विचार करा . 
तुम्ही  ते नातं तोडून खरच खुश राहणार आहात . तुम्ही ते नातं कधीतरी तोडण्यासाठी  जोडलं होतं का ? 
की तुम्हाला ते नातं जोडून खूप फायदा होणार होता . आणि फायदा झाला नाही. म्हणून तुम्ही तोडण्याचा निर्णय घेतला . असं काही होतं का एकदा विचारा अंतर मनाला ..आणि मग ते नातं तोडण्याचा निर्णय घ्या ..
आणि मग जो निर्णय तुम्हाला योग्य वाट्टेल तो निर्णय घ्या. तो पर्सनल प्रश्न आहे . मी त्या विषयावर नाही बोलू शकत . 

माझा विषय आहे . फ्युचर नसलेल्या नात्याबद्दल माझे मत मांडण आणि मी ते मतं पूर्ण प्रामाणिक पने मांडणार.

   फ्युचर नसलेल्या नात्याला चुकीची उपमा देऊ नका ..
   जग काय म्हणेल , ह्याचा विचार करत कुठल्याच नात्याला पूर्णविराम देऊ नका ..
जस प्रत्येक स्वप्न सत्यात उतरत नसतं ..
तसं प्रत्येक नातं फ्युचर घेऊन जन्माला येत नसतं ..
हेचं एक आहे सत्य ...
ते सत्य स्वीकारूनचं ..नातं जोडण्याचा प्रयत्न करा.  आणि जोडलेलं नातं शेवटपर्यंत निभवण्याचा प्रामाणिक पने प्रयत्न करा .....

चुकीस क्षमस्व : 

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...