ते मला जमिनीतचं गवसलं ..
उमेदीने जगताना ,
सुख हरवल्या सारखं वाटलं ,
दुःख दिसेनासं झालं ,
आयुष्य खूपच बिझी झालं ,
माझ्यातल मी पणचं हरवलं ,
एकांतात जावं म्हंटलं ,
तर माझंचं मन ,
माझ्यावर हसलं ..
आपल्याच माणसांसाठी वेळ पुरेना ,
कुठे एकांत शोधायला चालला ?
हक्कान विचारलं !
स्वतःपासून दूर पळण्याचा ,
खूप प्रयत्न केला ..
तरीही शेवटी शोध ,
हा माझ्या पाशीच येऊन संपला ...
Written by -
Durga mate
सुंदर रचना 👌👌👌👌👌
ReplyDeleteखूप सुंदर 👌👌👌
ReplyDelete