" असं कसं रे प्रेम तुझ ? घडीत जागं होतं . आणि घडीत अलिप्त होतं . मी व्यक्ती आहे . भाव - भावना आहेत मला
तुझ्यासारखचं एक मन आहे मला , ज्याचा तुला विसर पडलाय . " वसू अत्यंत तळमळीने बोलत होती.
तरीही समीरचा तिला काहीचं रिस्पॉन्स नव्हता . तो मूग गिळून गप्प बसला होता . ती तनफण - तनफण करत होती . रडत होती . पण तो मात्र शुंभा सारखा नुसत तिच्याकडे बघत होता . तिच्या डोळ्यातील पाणी वाहत होता . तरीही त्याला काहीही फरक पडत नव्हता . तिला त्याच्या तशा गप्प बसण्याचा खूपच त्रास व्हायचा .
आणि हे फक्त आज पहिली वेळेस नव्हत घडल . हे सारखं सारखं घडायचं . हिला फार त्रास व्हायचा . म्हणून आज तो काय प्रेमाचा शेवट करायचा . असं मनात ठरवूनचं ती त्याच्याशी बोलत होती ...
" बोल ना रे ! असा काय मुग गिळून गप्प बसला " , ती श्वास एकवटून म्हणाली .
त्याने एक शब्दही उच्चारला नाही . तिच्यासमोर उभा असलेला समीर बेड वर बसायला गेला . तिला तर जावून एक थोबाडीत द्यावी वाटतं होती त्याच्या पण हात बांधलेले
श्वास कुठेतरी त्याच्यात अडकले होते.
म्हणून ती गप्प राहिली . रड रड रडली . तिचं रडगाण बघून समीर घरातून फरार झाला .
" का रडतेस ? काय झालं ? "
हे विचारायचं तर दूरच ती रडत असताना साधं त्याने तिच्याकडे ढुंकून ही पाहिलं नाही . तशीच त्याने बाईक काढली आणि बाहेर निघून गेला ...
त्याच तस काहीचं न बोलता निघून जाणं खूप त्रासदायक होतं तीच्यासाठी . ती अजूनच जोर जोरात रडायला लागली . तिचा आक्रोश एवढा वाढला की शेजारच्या घरी गेले समीरची आई घरी परतली ..
" काय ग ? काय झालं एवढ्या मोठ्या ने का रडतेस ? आणि समीर कुठे गेला " त्याची आई तिला शांत करत विचारत होती .
तिने ही स्वतःला सावरलं घडलेला सारा प्रकार समीरच्या
आईला सांगितला...आईला त्याच्या तशा वागण्याचं गूढ चांगलचं माहीत होतं.
" शांत हो बाळा , नको रडूस अशी . अग तो तसाच वागतो . माझ्याशी पण तसचं वागतो . कारण मेंटल प्रोब्लेम आहे त्याचा मानसिक आजार आहे त्याला . शक्य असेल तर विसर माझ्या लेकराला आणि त्याच्यापासून मुक्त हो .
तो तुझ्यावर कधी प्रेम करेल ही आशा सोडून दे . कारण त्याने अजुन माझ्यावर ही कधी खरं प्रेम केलं असेल ह्याची खात्री नाही देऊ शकत.
अग तू त्याच्यासोबत खुश राहशील अस मला तरी नाही वाटत . विसर बाळा तू त्याला एक आई नाही तर , एक स्त्री म्हणून तुला सांगते . आता तुझी इच्छा ! "
आई ने सांगितलेला त्याचा आजार ऐकुन ती निशब्द झाली . आईच्या कुशीत जाऊन रड रडली .
" थँक्यू आई तुम्ही मला समीर बद्दल खरं खरं सांगितल .
मी उगाच इतक्या दिवस त्याच्यासाठी थांबले होते . आता नाही थांबणार एक नवी झेप घेणार . आशीर्वाद असू देत आई . "
" अग बाळा , थँक्यु काय ? आई बोलतेस ना मग थँक्यू काय ? " आई तिच्या कपाळावर किस करत बोलल्या .
" आई आपल्याच मुलांबद्दल एवढं वाईट सत्य कुठलीच आई सांगत नाही " ती त्याच्याकडे प्रेमाने बघत बोलली .
" माझ्या मुलामुळे कोणत्याही चांगल्या मुलीचं आयुष्य बरबाद व्हावं . असं नाही वाटतं बाळा मला " आई हुंदके देत देत बोलल्या ...
" आई ...." हा शब्द उच्चारत वसू आईच्या कुशीत शिरली आणि रड रडली ...आणि आयुष्याची एक नवीन सुरुवात
करण्यासाठी सज्ज झाली ..
कशी वाटली माझी ही स्टोरी आवडल्यास कॉमेंट नक्की करा ..
No comments:
Post a Comment
Comments plz.