नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Jan 6, 2022

लेखक जन्माला येतो .....

आयुष्यात कितीतरी चांगले वाईट अनुभव ..खाच खळग्यांचा ..प्रवास . संघर्षाची रात्र ह्यातून जन्माला येतो तो लेखक ...कवी अजरामरचं होतो ...

रचनेत त्याचे अनुभव टिपत असतो . लेखाद्वारे मानवी संदेश तो देत असतो . कथेमध्ये त्याचेच आयुष्य तो मांडत असतो . 

लेखक हा त्याच्या परिस्तिथीतून मनस्थितीतून जन्माला येत असतो.  

परकेपणा झेलत झेलत तो  जगत असतो . वेडा कवी म्हणून जगप्रसिध्द होतो . लेखक कवी हा ऑन द स्पॉट जन्माला येतो . परिस्थिती वर मात करून तो नावा रूपाला येत असतो . 

लेखक  - कवी जितका कणखर तितकाच हळवा असतो.
सूर्याची प्रखरता चंद्राची शीतलतेचं रूप असतो . 

टीका त्याच्यावर पेटून उठतात , 
लिखाण त्याचं बदनाम करण्याचा प्रयत्न करतात.  तरीही त्याचे शब्द त्याला लढण्यासाठी बळ देतात. कल्पना त्याची सहानुभूती होते.  नकळतपणे त्याची मानसिकता त्याचीच सकारात्मकता होते ..

लेखक - कवी संकटांवर मात करूनचं जन्माला येतो.  
नव्या जिद्दीने , नव्या उमेदीने त्याच्या लिखाणाला बळ देतो ..

हा लेख लिहिताना कोणाच्याही मनाला किंवा भावनेला ठेच पोहोचली असेल तर चूकिस क्षमस्व : 

दुर्गा मते 
©® 

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...