राधिका ताईने आपल्या टोपल्यात असलेल्या दोन ज्वारीच्या भाकरी आणि पिठल त्याच्यासमोर ठेवलं . आणि त्याला पिण्यासाठी पाणी दिलं . त्याने घठा घठा पाणी पिल . मन तृप्त झालं . भाकरीचा एक तुकडा तोंडत टाकला . तेवढ्यात त्याची अर्धां गिनी आली . आणि त्याच्यासमोर असलेलं . ताट हिसकावून घेत बोलली , " मी तुला शेवटच्या श्वासापर्यंत अन्नासाठी तर सवणार . तू शेवटी तळ तळ करत मरला पाहिजे ते ही केवळ अन्नासाठी .
तिचे ते बोल ऐकून सर्वांना च तिचा तिटकारा वाटला . तेवढ्यात शांत असलेला अण्णा आणि शेवटच्या घटका मोजत असलेला अण्णा तळमळीने बोलला ..
" तू आज मला अन्ना साठी तर सवत आहेस ना , अशीच एक दिवस तू ही तरसशील . आणि मग तुला माझी आठवण येईल . माझ्याही पेक्षा तुझी अंतयात्रा जास्तीचं भयानक असेल . तुझ्या पापाचा घडा भरला आणि तो लवकरच फुटेल लक्षात ठेव . " असं बोलून त्याने शेवटचा श्वास घेतला .
त्याचा शेवटचा श्वास तिचा आनंद गगनात मावेनासा झाला . तिने त्याला शेवटचा नमस्कार तर केलाच नाही . त्याच्या देहाला लाथ मारली . आणि ती तिथून निघून गेली .
देव करो अशी घटना कधीच कोणा बरोबरही न घडो . शेवटच्या क्षणी जेवढं आपल्याला शक्य असेल , तेवढ्या त्या आत्मच्या ईच्शा पूर्ण करायला हव्या ..
ही कथा पूर्णतः काल्पनिक तेवर आधारित आहे . कोणत्याही व्यक्तीशी किंवा घटनेशी संबंधित असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा ..
No comments:
Post a Comment
Comments plz.