जेव्हा एक मूल जन्माला येते ..
तेव्हा एक स्त्री आई म्हणून जन्म घेते ..
आयुष्य तिचं तिच्या बाळासाठी पणाला लावते ..
स्त्रित्वाचे पांग फेडते ...
काय सांगू स्त्रित्वाची कीर्ती .
माया ममता ह्याची ती अजाण मूर्ती ..
गर्भात अंकुर वाढवते तिच्या प्रेमाचे ..
अंश ते साक्षीदार कित्येक गोड क्षणाचे ..
एक स्त्री जन्म बालकास देताना पुन्हा जन्मते ..
आईच्या रुपात साक्षात भगवंत श्री कृष्ण चं जणू अवतरते .
त्या बालकांचे संगोपन करते ..
सृष्टी निर्मिती पूर्ण करण्यास मदत करते ..
दुर्गा मते
No comments:
Post a Comment
Comments plz.