उदरात तुला वाढते .
गर्भात तुला जपते .
तुझ्यासाठी मी रे नवा जन्म घेते .
सोनेरी आयुष्य माझे तुला दान करते ..
जशी चाहूल तुझ्या येण्याची .
तशी उमळते कळी माझ्या स्त्रित्वाची .
क्षण माझ्या आयुष्याचे ..
साक्षीदार होई तुझ्या जन्माचे ..
तुला जन्म देता देता ....
मी ही पूर्नजन्म घेते ..
तुझ्यासाठीच जगण्याचे स्वप्न वेडे बघते ..
Written by - durga mate
No comments:
Post a Comment
Comments plz.