नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Jan 26, 2022

नुसत म्हणायचं आम्ही शिवभक्त

नुसत आम्ही शिवभक्त म्हणून चालत नाही . तस वर्तन ही असावं लागतं . स्त्रियांच्या नादी लागणं त्यांना विनाकारण त्रास देणं ही कुठली शिव भक्ताची लक्षण आहेत .

पोलिस कंप्लीट करेन अशा वारंवार धमक्या देणं हे शिव भक्तांना शोभत का ? खरच शिवभक्त असाल ना , इथे लिपीवर दादागिरी करण्यापेक्षा रस्त्यावर दररोज  होणारे बलात्कार थांबवण्याचा प्रयत्न करा . किती तरी लोक अन्याय सहन करत आहे . त्या अन्याय सहन करणाऱ्यांना अन्यायाविरुद्ध लढण्याच बळ द्या .

आणि नुसतच टिव टिव काय करायची.  काही तरी अॅक्शन घ्या की , स्त्रियांच्या विरोधात पोलीस कंपिल्ट करन हे वाटत तितकं सोपं नक्कीच नाही.  हे ज्याला कळलं तो खरच ग्रेट ....

कंप्लीट करणारा मूर्ख असू शकतो , पण रिपोर्ट करणारा मूर्ख नक्कीच नसतो.  तो खूप ग्रेट असतो . तो कुठल्याही स्त्रीचं नाव कधीही रिपोर्ट नाही करत आणि त्यात अविवाहित मुलींच तर , नाहीच नाही . हे माहीत असलं म्हणजे मिळवलं ...

कोणी जर विनाकारण आम्ही शिवभक्त आमचे संस्कार ग्रेट असं म्हणत दादागिरी करत असेल ना तर , त्यांनी ही दादागिरी थांबवावी कळकळीची विनंती ..कारण तुम्ही समोरच्याला बदनाम करण्या च्या नादात स्वतः ही बदनाम होत आहात हे विसरत आहात ..

  हा लेख मी कोणाचेही मन दुखावण्याचा हेतू ने लिहिलेला नाही . माझ्या अनुभवावरून आणि वैचारिक पातळीवर लिहिलेला आहे ...
तरीही कोणाचे कळत नकळत मन दुखवल्या गेलं असेल तर , चुकीस क्षमस्व ...

1 comment:

  1. मनातला असंतोष अचुक मांडला आहेस नित्या...अप्रतीम लेखनशैली...👏👏👏

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...