शेवटी तर ते हॉटेल मध्ये न जेवता घरीच पार्सल घेउन आले होते ..आता बघुया पुढे ..
नित्याने दरवाजा ओपन केला दोघेही आत मध्ये गेले . ती आणि तो दोघेही फ्रेश झाले . तिने ता ट वाढून घेतले .
ते जेवायला बसले ..
" तू तर खूपच घाबरते स एवढं घाबरून चालत नाही ." तो तिला म्हणाला ..
" मी कुठे घाबरते ..म्हणजे नाही घाबरत. " ती म्हणाली .
" मग आज काय होतं . ते ? " तो
" हा ..म्हणजे ..नवीन शहर ना त्यामुळे जरा .." तिचा चेहरा खूप पड ला ..
त्याला हसायला आलं . तिचा पडलेला चेहरा बघून ..
पण तिला वाईट वाट्टेल म्हणून त्याने कंट्रोल केलं .
आणि ते जेवायला लागले ..जेवण वैगरे झाल्यानंतर झोपण्याची तयारी केली . तिने त्याला गेस्ट रूम मध्ये झोपायला सांगितले . आणि ती तिच्या रूम मध्ये झोपायला गेली . दिवसभर त्यांना विशेष असं काही वाटलं नाही . पण रात्र ही जरा बोचली . एका स्त्री आणि पुरुषाने एकच घरात ते ही आपले आपले जोडीदार नसताना हा विचार येऊन गेला .
ते याबाबत स्पष्ट बोलले नसले तरी , त्याच्या चेहऱ्यावर ते स्पष्ट दिसत होत . पण झोपले कसे तरी झोप काही दोघांनाही लागली नाही . कशी तरी रात्र सरली नी पहाट झाली .
" गुड मॉर्निंग , मग झोप झाली ना व्यवस्थित " नित्या ने राहुल साठी चहा आणला आणि ती त्याला विचारू लागली ..
" Hmm पण एवढी खास नाही लागली ..नवीन जागा त्यामुळे .." तो चहाचा एक घोट घेत म्हणाला ..
तिने तिच्यासाठी ही चहा आणला होता . ती पण त्याच्यासोबत चहा पीत होती .
" Hmmm माझ ही same तेचं होतं आहे. इथे आल्यापासून झोप म्हणजे नक्की काय तेच विसरले मी त्यात शेखर पण मला एकटीला सोडून गेले .." आणि ती अचानक स्थब्ध झाली .
" I can understand " तो म्हणाला .
तिने फक्त गोड smile दिली. " बरं खाण्यासाठी काय बनवायचं . की ऑर्डर करायचं काही . " ती विषय बदलत बोलली.
" ऑर्डरचं करू कशाला त्रास करून घेते ." तो म्हणाला
" त्रास कसला ? ऑर्डर नको काहीतरी छान खायला बनवते . कालपासून आपण बाहेरचं खातं आहो . बाहेरचं खाणं तब्येतीसाठी चांगलं नसतं ." असं म्हणत ती किचन मध्ये गेली .
तो ही तिच्या पाठोपाठ गेला . ती स्वयं पाक करायला लागली . आणि तो तिच्या मध्ये मध्ये लहान मुलांसारखं .
" बरं ऐक जर आपण घरीच जेवण बनवणार असू तर , मग मी पण तुला हेल्प करणार . चालेल का ? "
ती त्याच्या बोलण्यावर हसली . तिने कपाळाला हात लावला . " तू काय हेल्प करणार मला ."
" ये , हसू नको ..छान जेवण बनवता येत मला . " तो म्हणाला ..
" बरं नाही हसत ..तू आधी अंगोळ करून ये . आणि मग मला हेल्प कर .." ती म्हणाली ..
" हो ते राहीलच नाही का ? येतो मी लवकर अंगोल करून .." तो अस म्हणत धावत रूम मध्ये अंगोलीला गेला ..
त्याची अंगोल होई पर्यंत तिने कणिक बिजवून पोळ्या पण केल्या तरी तो रूम मधून बाहेर आला नाही . मग हीच गेली त्याच्या रुम मध्ये. त्याला बघून हँग झाली .
" काय भारी दिसतोस रे . "
" काय बोललीस ? " त्याने विचारलं ..
तिला तर तिचीच लाज वाटली . " काही नाही . काही नाही अस म्हणत तीने विषय बदलला ..चल आता , तू हेल्प करणार होतास ना मला .."
" हो म्हणजे काय ? चल " त्याने पनीर ची भाजी
" व्वा वास तर खूपच छान येतोय . राहुल तू एकदम छान कुक आहेस. " ती म्हणाली ..
" हो ते पण आहे. चल आता जेवायला मला खूप भूक लागली . " तो म्हणाला ..
" मला पण चल "
दोघांनी पण जेवण केलं . आणि पुन्हा हॉल मध्ये निवांत बसले ..
" राहुल तू भाजी खूप छान बनवली होती पण .." ती म्हणाली ..
" मी छान चं बनवतो भाजी .. ऐक ना " तो म्हणाला
" मी निघू का आता ..खूप काम आली आहेत ..मला निघाव लागेल ..
" ओके चालेल . बॅग भरुया आपण . " असं म्हणत ते दोघेही गेस्ट रूम मध्ये गेले. बॅग वैगरे भरली . आणि हॉल मध्ये आले ..
दुपारचे तीन साडे तीन वाजले असतील . निरोप देताना दोघांचेही डोळे भरून आले होते .
" पोहोचल्या नंतर मला आठवणीने कॉल कर .." ती म्हणाली .
" हो बाय बाय. " म्हणत त्याने तिला घट्ट मिठी मारली . आणि आपल्या परतीच्या प्रवासाला निघाला ..
क्रमशः ..
पुढील भाग लवकर ..
खुप सुंदर होता हा भाग... ह्रदयस्पर्शी...प्रतीक्षा पुढील भागाची...👏👏👏🥰
ReplyDelete