नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Jan 9, 2022

तुझ्याही नकळत ..

तुझ्याही नकळत ,
तुझ्या हास्याच गुपित व्हायला आवडेल मला ,
तुझ्याही नकळत ,
तुझ्यावर प्रेम करायला आवडेल मला ..
तुझ्याही नकळत ,
तुझा राग शांत करायला आवडेल मला ,
तुझ्याही नकळत ,
तुझ्यासाठी प्रेम पत्र लिहायला आवडेल मला ,
तुझ्याही नकळत ,
तुझे ओघळणारे अश्रू झेलायला आवडेल मला ,
तुझ्याही नकळत ,
तुझी सकारात्मक ऊर्जा व्हायला आवडेल मला ..
तुझ्याही नकळत ,
तुझ्या स्वप्नात यायला आवडेल मला ,
तुझ्याही नकळत ,
तुझ्यात मनात घर करून रहायला  आवडेल मला ,
तुझ्याही नकळत ,
 तुझ्या ओठांची तहान व्हायला आवडेल मला ,
तुझ्याही नकळत ,
तुझ्या आसुसल्या देहाचा एक पराग व्हायला आवडेल मला , 
तुझ्याही नकळत ,
फक्त तुझ्यासाठी जगायला आवडेल मला ,
तुझ्याही नकळत ,
तुझ्यावर प्रेम करायला आवडेल मला ...❣️❣️❣️❣️

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...