नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Jan 11, 2022

निरीक्षण ...

पुन्हा हे काय खुणावत आहे ..
ह्या मार्गाला अंधाराची सवय आहे . 
माझ् निरीक्षण तंतोतंत आहे....

हा लेख केवळ अनुभव आणि निरीक्षण ह्यावर आधारित लिहीत आहे . विषय हा पूर्णपणे वेगळा आहे . शीर्षकाला शोभेलच अस नाही . आता वेळ न दवडता मी मेन मुद्द्यावर लिहायला सुरुवात करते . कुठून सुरुवात करावी कळेना . पण करते सुरुवात ..

     आज काल gf आणि bf चं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढतांना दिसतं . म्हणण्यापेक्षा ते प्रमाण वाढलेलेचं आहे . त्यात गैर असं मला तरी काहीच वाटतं नाही . वय असत . ज्या त्या वयात जे ते अनुभव आणि जो तो एन्जॉय करून घ्यायला पाहिजे . कारण एकदा वय निघून गेलं ना तर , मग सगळ्याच गोष्टी करायच्या अपूर्ण राहून जातात . आणि मग नंतर हळुवारपने आपलं हे करायचं राहून गेलं . केलं असतं तर निदान फिल तरी करता आलं असतं . हा विचार अलगद मनाला स्पर्शून जातो. पण तेव्हा हातात अस काहीच नसतं . त्यामुळे ज्या वयात ज्या वयात ज्या गोष्टी करण शक्य आहे . त्या त्या गोष्टी करून घ्यायलाच पाहिजे. अगदी प्रेमापासून ते विरहा पर्यंत साऱ्याच . साऱ्याच गोष्टी अनुभवायला हव्यात . 

        प्रत्येक अनुभव आपल्याला काहीतरी नवीन शिकवत असतो . प्रत्येक अनुभवातून योग्य ती शिकवण घ्यायला पाहिजे . एखादा वाईट अनुभव आला म्हणजे लगेच घाबरून जायचं नाही . जगापासून दूर पळण्याचा प्रयत्न ही करायचा नाही . उलट नवीन उमेदीने दुसरा अनुभव घेण्यासाठी सज्ज व्हायचं . मग तो अनुभव कटू असो किंवा गोड ...

   विषय मी जास्त पांगत नाही ...

माणसाने प्रत्येक गोष्ट अनुभवायला पाहिजे . हे आजच्या एकविसाव्या शतकातील मुला मुलींना मान्य असतं . पण ह्याचं एकविसाव्या शतकातील मुला मुलींचे आई वडील त्यांना ही गोष्ट मान्य नसते. आणि ते त्यांच्या ठिकाणी बरोबर पण आहेत . मी त्याच्या बद्दल कोणतेही अपशब्द तोंडातून काढणार नाही . किंवा ह्या लेखात ही मांडणार नाही .
पण बऱ्याच गोष्टी आज मी इथे स्पष्ट मांडणार आहे . ज्या पूर्ण गोष्टी माझ्या निरीक्षणातील आहे . 

    लव्ह मॅरेज आजही खूप ठिकाणी ह्याला विरोध होतो . तुरळक ठिकाणी ह्याला मान्यता मिळते . त्याला मान्यता मिळायला हवी हा पॉईंट नाही माझा ..

     मुली प्रेमात का पडत असतील ? हा प्रश्न नाही पडत मला कधी आणि कधी पडणार पण नाही . कारण ह्या प्रश्नाचं उत्तर मला सापडल आणि ते उत्तर मला पटलं ही तेच आज मी इथे सांगते . तुम्हाला पटत की नाही ते पण सांगा . 

    कुठल्याच मुलीची इच्छा नसते . आपल्या आई वडिलांची मान आपल्यामुळे खाली जाईल अस वागण्याची .

 पण विश्वास न ठेवण्यासारखी गोष्ट आहे . बऱ्याच मुलींवर ही वेळ त्यांच्या आई वडिलां मुळेच येते . 
त्यांच्या आई वडीलांमुळेच त्यांना बाहेरच्या जगात आभासी प्रेम शोधावं लागतं . आणि ते एकदा झालं ना तर , मग त्यातून बाहेर पडणं शक्यच नसतं . आई वडिलांनी प्रेम स्वीकारलं नाही तर , मग शेवटचा ऑप्शन पळून जाणं किंवा आत्महत्या करणं एवढंच त्यांना माहीत असतं . पण आपण कधी ह्याचा विचार केला का ? ही वेळ त्यांच्यावर का आली ... नाही कधीच नाही ना ...


   माझी एक मैत्रीण होती आणि आता सध्या एक आहे . ज्या माझ्याशी एकदम सगळ्या गोष्टी फ्रीली शेअर करतात . ती तिच्या आई वडिलांचा खूप विचार करते . तिची आई तिचा जीव की प्राण आहे .  
तरीही तिने फिक्स केलय आपलं प्रेम जर उद्या कोणीही स्वीकारलं नाही तर पळून जायचं . तिची लव्ह स्टोरी पण खूप छान आहे . त्यामुळे तिचं ठाम मत मला कधी कधी आवडत . पण कधी कधी नकोस वाटतं . उगाच आई वडिलांचं नाव खराब होईल . अनेकदा मी तिला समजवण्याचा प्रयत्न ही केला . पण ती ऐकणार नाही . ह्याची मला खात्री आहे ... 

हीची कहाणी जर पहिली ना तर खरच विचार करण्यासारखी आहे . तिच्याशी जेव्हा जेव्हा बोलत असते . तेव्हा तेव्हा वाटतं हीच्यावर काही तरी लिहावं हा लेख जरी मी लिहीत असले ना , तरी ह्याचं संपूर्ण क्रेडिट तिलाच जातं . कारण हा विषय आज मला तिच्यामुळेच सुचला .. 

   कुठलीच मुलगी कधीच प्रेमात पडणार नाही . जर तिला तिच्या घरात योग्य तो मान सन्मान दिला तर , ती प्रेम शोधायला बाहेर पडणार नाही . वडिल वयात आलेल्या मुलीला उंच आवाजात बोलले नाही तर काय फरक पडतो का ? नाही ना ..

  मग प्लीज नका बोलू तुम्ही तुमच्या मुलीला उंच आवाजात कारण , वयात आल्यानंतर नाही सहन होतं तिला आपले वडील उंच आवाजात बोलतात ते . मलाही नाही आवडत माझे वडील मला कधी उंच आवाजात बोलले ते आणि कधी आवडणार पण नाही . माझ्या आईला पण नाही आवडत . माझे वडील जेव्हा माझ्याशी
उंच आवाजात बोलतात तेव्हा आणि कुठल्याच मुलीला नाही आवडत ....

तिचं चुकलं तिला प्रेमाने समजून सांगा . प्रत्येक वेळेस तिच्यावर चिडण हाच पर्याय नसतो . आणि मग जर तुमच्याकडे तोच पर्याय असेल ना तर , मग तोच पर्याय तुमची लेक तुमच्यापासून दूर दूर चालली हा संकेत पण असतो ..... कटू आहे पण सत्य आहे ..

तिला जेव्हा तुमच्या कडून प्रेम मिळत नाही. ना तेव्हाच तिला बाहेरच्या जगात प्रेम गवसत . तिला समजून घेणारा. 
वेळोवेळी कॉल करून विचारपूस करनारा . " जेवलीस काय ? मूड ठीक आहे ना ? फिरायला जायचं का ? "
असं आपलेपणा दर्शवनारे कितीतरी प्रश्न विचारनारा तिच्यासाठी जगणारा लव्ह यू ..किस यू बोलणारा हवा हवासा वाटतो . सुरुवातीला आई वडील आधी आणि मग नंतर तो अस असतं. आणि काही काळाने सर्वात आधी तो मग जग हे समीकरण होऊन बसत. तेव्हा जन्मदात्या आई वडिलांचं मोल ही शून्य असतं . 

पण खरं पाहिलं ना इथे चूक कोणाचीच नसते . मुलं वाईट वळणाला लागू नये म्हणून आई वडील धाक दाखवतात . 
आई वडिलांचा धाक मुलांना नको असतो . म्हणून ते त्यांचं वेगळं विश्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतात . 

जो तो ज्याच्या त्याच्या ठिकाणी बरोबर असतो . आपण कोणालाही चुकीचं नाही ठरवू शकत . 

पण एक सांगते समजून जर घेतलं ना , तर अनेक वाईट गोष्टींना आळा बसू शकतो . आई वडीलांनी पण मुलांना समजून घ्यायला पाहिजे . ते आपल्या आयुष्यातील छोट्या तील छोटी गोष्ट आपल्या बरोबर शेअर करू शकले पाहिजे . एवढं फ्रीडम प्रत्येक आई वडिलांनी आप आपल्या मुला बाळांना द्यायलाच हवं . तरच खऱ्या अर्थाने प्रेम - माया - ममता जिव्हाळा - आपुलकी टिकून राहील. 

हा लेख लिहिण्यामागचा उद्देश एवढाच आई वडील आणि मूल ह्याचं नातं एकदम फ्री असायला हवं . केवळ प्रेम फॅमिली य प्रेम मिळत नाही . ह्या कारणामुळे मुल किंवा मुली प्रेमात पडायला नको . ह्या कारणा व्यतिरिक्त जेव्हा व्यकी प्रेमात पडतो . ना ते खरं प्रेम असतं . आणि तेच प्रेम शेवट पर्यंत टिकतं . 

केवळ घरचे प्रेम करत नाही . म्हणून प्रेम बाहेर शोधण्याचा प्रयत्न करणं हा मूर्खपणा आहे . घरचे ही आपल्यावर खूप प्रेम करत असतात . हे सगळ्यात आधी समजून घ्यायला हवं . तरच प्रेम म्हणजे नक्की काय असतं हे ही कळू शकत . ते चिडतात , रागव तात आपल्याच साठी हे ही समजून घ्यायला हवं . आई वडिलांनी ही आपल्या लेकरांना एकट एकट वाट्टेल असं वागायला नको . सर्वांनी समजून घ्यायला हवं. 

हा लेख लिहितांना कोणाच्याही भावना नकळत दुखावल्या गेल्या असतील तर माफी असावी . कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नाही . मी फक्त माझे विचार मांडत असते पूर्ण प्रामाणिक पने ...

मी डायरेक्ट पॉइंट मांडते . मी लेटेस्ट विचारांची लेटेस्ट लेखिका आहे . त्यामुळे माझे सगळेच पॉइंट तुम्हाला पटतीलं अस नाही . जे नाही पटलं ते बिनधास्त सांगा कॉमेंट बॉक्स मध्ये ....

थँक्यू सो मच ऑल ऑफ यू ...🙏🙏🙏🙏

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...