काळ बदलला , वर्ष गेली..
पण मी नेहमी आपलेपणा जपत आनंदाने जगत राहिली ..
चूक नसतानाही अनेकदा स्वारी बोलले ..
दुरावलेली मने अनेकदा स्वखुशीने जोडले .
हा लेख माझ्या आवडीचा विषय . मला नाती जोडायला आणि जोडलेली नाती जपायला खूप आवडत . मी एकदा माणसाला जवळ केलं ना की , अंतर देत नाही . नात्याला नाव असो नसो मला जोडलेलं प्रत्येक नातं खूप प्रिय असतं .
मी कुठलच नातं स्वार्थी पणाने जोडल नाही . हा भांडते ही खूप limits नाही . पण थोडी शांत झाले चूक कळली ना की खूप वाईट वाटत . लगेच पुढचा मागचा विचार न करता स्वारी बोलायला जाते .
थोडीशी अल्लड आहे . त्यामुळे चालत . सगळे चालून घेतात. आणि कोणी नाही घेत. पण मी आहे तशीच आहे . बदलेल की नाही माहीत नाही . जाऊ दे मी डायरेक्ट विषयाला हात घालते .
माझा आजचा विषय आहे ..
' भाव जर दिला नाही ना तर , नाती तुटतील '
आपण अनेकदा म्हणतो , " कशाला कोणाला भाव द्यायचा . समोरचा बोलला तर , बोलायचं समोरून कोणालाही बोलायला जायचं नाही ." पण खर तर , चुकीचं आहे . जो विचार सध्या आपण करत असेल , तोच same विचार जर समोरचा व्यक्ती ही करत असेल तर ? मग बोलणंच होणार नाही .
आपण वाट बघू त्याने आधी बोलण्याची तो वाट बघेल आपण आधी बोलण्याची मग काय बोलणं चं होणार साईड इफेक्ट काय होईल ? नातं क्लोज होईल . माणुसकी हळू हळू हरवत जाईल .
करेक्ट आहे का हे ? मला विचाराल तर बिलकुल नाही . नाती जर टिकवून ठेवायची असेल ना तर , थोडासा attitude बाजूला काढून ठेवावा लागेल . चूक नसताना ही अनेकदा स्वारी बोलण्याची सवय करून घ्यावी लागेल .
तरच कुठे नाती ही टिकतील . कोणाला हे जमेल कोणाला हे नाही जमणार . स्वभावावर dipend आहे ते .
ज्याला इगो महत्वाचा त्याला नाही जमणार आणि ज्याला नाती महत्वाची त्याला नक्की जमेल .
नसतील तुमच्याकडे माणसं जिवाभावाची ,
सुख दुःख हक्काने व्यक्त करण्यासाठी ..
मिळालेलं यश बघून पाठीवर शाब्बासकी देणारी .व्यक्ती
तर काय कामा चा तुमचा attitude इगो त्यापेक्षा तोच इगो आणि attitude बाजूला ठेवून नात्यांना जपणं केव्हाही चांगलं ..
हा लेख मी कोणाचेही मन व भावना दुखावण्याचा हेतू ने
लिहिलेला नाही . तरी ही कोणाच्याही भाव ना दुःखवल्या गेल्या असतील तर मनापासून माफी मागते ..
Written by - durga mate ..
No comments:
Post a Comment
Comments plz.