नवीन शहर परकी माणस . नित्याला खूप एकटं एकटं वाटतं होतं . शेखर ची कमी खूपच जाणवत होती. ती सतत रडत होती . वेळ जावा म्हणून लिखाण करत होती . खूपच एकटं एकटं वाटलं तर मग कोणाशी तरी चॅटिंग वैगरे करत होती .
दिवस कसा तरी कटला पण रात्र तर , तिला खायला उठली होती . सायंकाळचे 6 वाजले असतील . तिने देवासमोर दिवा वैगरे लावला . आणि काहीतरी खायला करायचं म्हणून किचन मध्ये गेली .
काय करावं सुचत नव्हतं . केवळ एकटी साठी तिला पोळी भाजी बनवण्याचा कंटाळा आला होता. तिने खिचडीचं साहित्य काढलं कांदा वैगरे कट केला . एवढ्यात नको थोड्या वेळाने बनवते . जेव्हा जेवण्याची वेळ होईल तेव्हा गरमा गरम पोहे . असं म्हणत परत ते साहित्य व्यवस्थित झाकून ठेवलं. आणि हॉल मध्ये परत मोबाईल चाळत बसली ..
Wp आवडत्या व्यक्तीचा मेसेज बघून खूप खुश झाली .
कोणाचा असेल बरं हा मेसेज शेकरचा की राहुलचा ?
नका ताण घेऊ मीच सांगते . राहुलचाचं मेसेज आला होता.
Hi ! Can i call you ?
तिने मेसेजला रिप्लाय न देता डायरेक्ट त्याला कॉल केला.
" कसा आहेस ? " नित्या
" कसा असेन सांग बरं ? " राहुल
" तू तर मस्तच असणार तुझ्या बरोबर रिदिमा आहे ना . "
नित्या त्याला चिडवत बोलते .
" हो का ? मग तू कशी नाराज असणार .. तुझ्या बरोबर पण आहे की तुझा शेखर ..तू पण खुशच असणार ना. "
राहुल तिच्यावर चिडत बोलतो . पण जस्ट मजाक .
नित्या खोल आवाजात " नाही ना ! मी एकटीच आहे . बोर झाले खूप "
" Ohh ! शेखर कुठे गेला ? " राहुल ..
" तो बंधोबस्त करण्या साठी. मुंबईला काल . आठ दिवसांसाठी. आठ दिवस मी पुण्यात एकटीच. " नित्या
राहुल ती पुण्यात शिफ्ट झाली ह्याबद्दल काहीचं माहीत नव्हत . त्यामुळे तो ...मोठ्याने उंच स्वरात
" पुण्यात ? "
" हो पुण्यात " नित्या
" औरंगाबादचं पुणे कसं काय झालं ? " राहुल
" औरंगाबादचं काही नाही झालं . मी शिफ्ट झाले पुण्यात..." नित्या ..
" कधी झालीस ? तू मला बोलली नाही काही ? "
राहुल
" हो अरे ! नाही बोलले वेळ नाही झाला मला . शिफ्ट झाल्यानंतर घर सेट करण्यात काही दिवस गेले. आणि काल शेखर पण बंधोबस्त करण्यासाठी गेला. सो आज वेळ होता. म्हणून कॉल केला. आणि स्वारी रे तुला सांगितल नाही त्यासाठी ..." नित्या
" इट्स ओके ! मग आवडल की नाही पुणे ? " राहुल
" अरे बाबा ! आत्ता शिफ्ट झाले . अजुन मला रस्ते नीट नाही माहीत नक्की कोणता कुठे जातो. आणि शेखर पण गेले. उद्या मार्केट मध्ये जाण्याची पंचाईत आहे माझी . तू पुण्याचं काय विचारतोस मला " ती चिडली होती बहुतेक.
" चीडतेस काय मग नीट सांग ना . नीट सांगशील तर , जास्त व्यवस्थित कळेल मला .." राहुल
" चिडली कुठे रे ? सांगतेय तुला " नित्या
" तुझ तसचं आहे बघ . चिडते , रागवते. आणि वर बोलते . कुठे चिडले ? कुठे रागवले. " राहुल
" अरे काहीही काय ? " नित्या डोक्याला हात लावून बसली . काय माणूस आहे हा मनातल्या मनात पुटपुटत होती.
" काही नाही राहू देतं " राहुल
" अरे ! " नित्या
" जाऊ दे रे ! " राहुल
कुठे ह्याला डोकं लावत बसायचं असं विचार करून ती
" ओके जाऊ देत " बोलते .
" Hmm , good उद्या पुणे दर्शन माझ्या सोबत घेणार का ? " राहुल
" तुझ्यासोबत .." नित्या
" हो " राहुल
" अरे पण तू कोल्हापूर मी पुण्यात कस शक्य आहे. "
नित्या
" मी पण पुण्यात आहे . सर्व शक्य आहे तुला चालणार असेल तर , " राहुल
" ओके चालेल मला . ये तू उद्या . मी माझ्या घरचा adress सेंड करते. " नित्या ...
क्रमशः
काय वाटतं तुम्हाला कसं होईल नित्या आणि राहुलचं पुणे दर्शन . घेऊन येईल लवकरच ..
छान स्टोरी 👌🏼👌🏼🌟🌟🌟🌟🌟
ReplyDelete