पण तेव्हा वाटून काय फायदा . वेळ निघून गेलेली असते. हाती पश्चातापशिवाय काहीचं ऊरत नाही . तेव्हा उगाच चुटपुट लागून राहते. मन स्वतःच स्वतःलाच खात राहते . त्याआधी तोंड सांभाळल असत तर खरचं खुप बरं झालं असतं . असं वाटायला लागतं .
वेळ निघून गेल्यावर कोणत्याच गोष्टीला काहीचं अर्थ नसतो . काही गोष्टी अशा असतात. ज्या की वेळीच सावरायला पाहिजे . आवर घालायला पाहिजे . स्वतःवर मनावर . सर्वच गोष्टीवर .मग विनाकारण त्रास नाही होतं.
त्यात सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या तोंडून निघणारे शब्द . ते नकळत बाहेर पडतात . कधी कधी तर मनात काहीचं नसतं . बोलायला छान वाटतं. म्हणून बाहेर पडतात . शक्यतो रागाच्या भरात आपण खूप जास्त बोलतो . तोंडाला येईल ते बोलून जातो . नकळत
कारण तेव्हा त्या क्षणापुरता समोरच्या व्यक्तीचा चांगुलपणा आपण विसरलेला असतो. त्या व्यक्ती बद्दल मनात खूप राग आलेला असतो. म्हणून वाट्टेल ते बोलून जातो. त्याचा नंतर नात्यावर काय साईड इफेक्ट होईल.
ह्याची ही पर्वा करत नाही . तेव्हा खरं तर ते शब्द सावरायला हवे . थोडा त्या वर शब्दावर ही आवर घालायला हवा .
मला माहितेय ते वाटतं तेवढं सोपं नक्कीचं नाही . हे कारण मी पण खूप संकी आहे. राग आल्यावर काय बोलेल ह्याची खात्री नाही देऊ शकत . हा पण एक चांगला गुण म्हणजे . राग शांत झाल्यावर स्वारी बोलून समोरच्याला मनवते . त्यामुळे सहसा माझ्यावर कोणीही नाराज होतं नाही . पण समोरचा तरी कितीदा समजून घेईल . त्यामुळे मी शब्दावर कंट्रोल करायचं ठरवलेलं आहे . आणि करणारच. म्हणून तर हा लेख लिहून स्वतःला समजावते ....
शब्द हे खूप जपून वापरावे ,
ते एक शस्त्र असतं .
आपल्या चांगल्या व्यक्ती महत्वाचं ..
एक god gift असतं .
उज्वल भवितव्याच .....
तेच शस्त्र रक्षण करत असतं ..
जोडलेल्या प्रत्येक नात्याच ....
👌👌👌👌👌खूप सुंदर लेख, खरे आहे शब्द हे जपून वापरावे.
ReplyDeleteखूपच सुंदर अप्रतिम लिहले
ReplyDelete