नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Jan 11, 2022

मनाच्या ओंजळीत..

मनाच्या ओंजळीत ..

आपलेपणा जपला ..

स्वार्थासाठी नाही कधी जीव तळमळला ..

माणुसकीचा नाही कधी विसर पडला ..

संस्कार जपले ..
प्रेम ही उपमा ,
जोडलेल्या प्रत्येक नात्याला दिली ..
अनेकांच्या मनात मी घर करून राहिली ..

बोल - बोबडे गीत ,
नेहमीच हवे हवेसे वाटले ..
त्या गितां मध्ये नवखे सुर गवसले ..
त्या सुरांनी आयुष्याला रंग चढले ...

मनाच्या ओंजळीत ..
प्रेम - माया - ममता ..
नेहमी जागृत ठेवली ..
नाही कधीही देईल मी तिला तिलांजली ..

Written by -
Durga mate

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...