" ऐक ना . तू नको ना रागवुस ..प्लीज हवं तर , मी कान पकडते ..स्वारी ना ..खरच स्वारी .."
नीलिमा नयन समोर उभी राहून केविलवाण्या स्वरात म्हणाली ...
आज नयन पहिली वेळ तिच्यावर रागवलेला होता .
ह्याच्या पूर्वी कधीच नव्हता तिच्यावर रागवलेला . सतत एकमेकांशी भांडायचे पण आज पहिली बार तो तिच्यावर एवढा चिडला होता .
तो उंचच आवाजात म्हणाला , " रागवू नको तर , काय करू . तू सतत भांडत असते . माझ्याशी भांडते ते ठीक आहे . पण ; त्या मूर्ख लोकांच्या का नादी लागतेस . स्वतःची चं अब्रू घालवून घेतेस ते नाही आवडल मला . "
" अरे पण ते कसं बोलतात माझ्याशी . ते पाहिलं नाहीस का तू ? " ती आता तिचंच खरं असल्यासारखं बोलली .
" त्यांचं नको सांगू मला " नयन तिलाच गप्प करत बोलला .
" मग कोणाचं सांगू . म्हणजे त्यांनी कसंही वागायचं . आणि मी शांत राहायचं . असं का ? "
" गप्प रहायचं . अग तशा वेळेस काय होतं माहितेय का ? 50 टक्के लोकं तुला चुकीचे समजतात . आणि 50 टक्के तुला . मग ह्यात तुझीच अब्रू जाते . त्यामुळे शांत राहायचं ." तो तिला समजावत बोलला.
" बरं ..बरं ..आता नाही नादी लागतं ..पण तू शांत हो आधी आणि मला नेहमीप्रमाणे गोड smile दे .." ती पुन्हा कान पकडत बोलू लागली .
" ओके इट्स ओके. " म्हणत त्याने तिला माफ केल . आणि मिठीत घेतल. इथे आलं खरं प्रेम दिसून. जो आपल्यावर प्रेम करतो ना तो आपल्या चुका लगेच दाखवून देतो ...
Written by - durga mate
खूप सुंदर लिहिले आहे 👌👌👌👌
ReplyDeleteअतिशय सुंदर च 👌👌👌👌🙏🙏
ReplyDelete