नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Nov 8, 2021

कोमेजलेली कळी ....

कोमेजलेली कळी उमलू पाहत होती ,
आभाळाला गवसणी घालण्याची स्वप्न रेखाटत होती ..

भूतकाळ विसरून वर्तमान जगू लागली होती ,
भविष्याचे गुपित उलगडत होती ...

चेहऱ्यावर तेज पसरत नव्याने ती उमलली होती ,
ती भयानक रात्र विसरण्याचा प्रयत्न करत होती ...

पुन्हा एकदा नव्याने मोकळा  श्वास घेऊ पाहत होती ,
अंधारलेल्या आयुष्याला प्रकाशाची किनार नवी देऊ पाहत होती ...

बेरंग झालेल्या आयुष्याला रंग नवे देत होती ,
सकारात्मकतेचे सुगंध ती शिंपडत होती ...

उन्हात ती सावली शोधत होती ,
निरभ्र त्या आकाशात ती घर नवे बांधत होती ...

कोमजलेली कळी ती पुन्हा एकदा जन्म घेत होती ,
जगावेगळे तिचे अस्तित्व निर्माण करू पाहत होती ....

3 comments:

  1. खुपच सुंदर लिहिलं 👌👌👌

    ReplyDelete
  2. Apratim rachna 🌹🌹👌👌

    ReplyDelete
  3. अप्रतिम च👌👌👌👌👌🍫🍫🙏🙏

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...