आभाळाला गवसणी घालण्याची स्वप्न रेखाटत होती ..
भूतकाळ विसरून वर्तमान जगू लागली होती ,
भविष्याचे गुपित उलगडत होती ...
चेहऱ्यावर तेज पसरत नव्याने ती उमलली होती ,
ती भयानक रात्र विसरण्याचा प्रयत्न करत होती ...
पुन्हा एकदा नव्याने मोकळा श्वास घेऊ पाहत होती ,
अंधारलेल्या आयुष्याला प्रकाशाची किनार नवी देऊ पाहत होती ...
बेरंग झालेल्या आयुष्याला रंग नवे देत होती ,
सकारात्मकतेचे सुगंध ती शिंपडत होती ...
उन्हात ती सावली शोधत होती ,
निरभ्र त्या आकाशात ती घर नवे बांधत होती ...
कोमजलेली कळी ती पुन्हा एकदा जन्म घेत होती ,
जगावेगळे तिचे अस्तित्व निर्माण करू पाहत होती ....
खुपच सुंदर लिहिलं 👌👌👌
ReplyDeleteApratim rachna 🌹🌹👌👌
ReplyDeleteअप्रतिम च👌👌👌👌👌🍫🍫🙏🙏
ReplyDelete