नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Nov 9, 2021

प्रेम बंधन भाग 4

नित्याला तर  राहुलचा फार राग आला होता . त्याने त्या पोस्ट मुद्दामहून ठेवल्या होत्या . बोलायला नव्हतं तर स्पष्ट सांगायचं ना मी काय मागे लागली होती का ? 😡😡😡😡आता मी चुकून पण स्वतःहून मेसेज करणार नाही . त्याचा इगो आणि त्याचा attitude त्याला लख लाभो . 

दोन तीन दिवस ती त्याच्याशी बोलतच नाही . पण एकमेकांना साहित्याला कॉमेंट करण चालूच होत . मग तीन दिवसानंतर नित्याच रिचार्ज संपत . दोन दिवस ती account वरुन गायब hotspot कनेक्ट करून थोडफार लिहायची पण काही वाचत ही नव्हती आणि कोणाच्याही साहित्याला कॉमेंट पण करत नव्हती .
राहुल च पोस्ट शेअर करण चालूच होत . आणि तिच्या साहित्याला कॉमेंट करण ही काही त्याने सोडलं नव्हतं . 
मग दोन दिवसांनी तिच्या मोबाईल मध्ये recharj होतं .
ती सगळ्यांची गमंत घेण्याच्या दृष्टीने एक पोस्ट शेअर करते ..

नित्या पोस्ट - 
      " हॅलो फ्रेंड्स आय एम सॉरी सध्या साखरपुड्याची तयारी चालू आहे . त्यामुळे जरा bussy आणि सद्या साखरपुडा होईपर्यंत मला वाचायला आणि लिहायला जमणार पण नाही ..." 

अर्थात अशी पोस्ट शेअर केल्या नंतर अभिनंदन तर करणारच सर्व जण सर्वांनी अभिनंदन केल्यानंतर हीलाच कसं तरी वाटलं . पण हिच्या या पोस्ट ला राहुलची काहीतरी वेगळीच कॉमेंट आली होती ..

" फारच कमी वयात तुम्ही सर्व कारभार हाती घेतला . तो कारभार योग्य पार पाडा ल म्हणजे मिळवलं . " अशी कॉमेंट पाहून ती फक्त हसते . 😂😂😂🤣🤣🤣
आणि त्याला रिटर्न रिप्लाय देते .
😔😔😔 आता काय करणार घरच्यांनी मनावर घेतलं आणि मी त्यांच्या पुढे कस ना जाणार . 

आणि लगेच ती दुसरी पोस्ट शेअर करते ...
" सॉरी सकाळी त्या पोस्ट मध्ये माझ्या ताई च नाव टाकायचं राहील . साखरपुडा माझ्या बहिणीचा आहे माझा नाही . सो सॉरी ..." 

राहुल लगेच ह्या पोस्ट वर कॉमेंट करतो ...

" आता तुम्हाला 1 कोटी रुपये देऊन माफी मागावी लागेल  . " 

ती पण रिप्लाय देते ..." आता चूक केलीच आहे म्हंटल्यावर शिक्षा तर भोगाविच लागेल ..."

आणि तिच्या इनबॉक्स ला एक मेसेज येतो . खरच साखरपुडा कोणाचा आहे .. 

ती खूप खुश होते कारण तो मेसेज राहुलचा असतो . आज पाहिली वेळेस त्याने तिला स्वतःहून मेसेज केलेला असतो .  पण अर्धा तास ती काही त्याला रिप्लाय देत नाही . आणि तो बिचारा तिच्या रिप्लाय ची एकसारखी वाट बघत असतो . 

मग ती अर्ध्या तासानंतर त्याला रिप्लाय देते .. का रे असं का विचारतो . साखरपुडा माझ्या बहिणीचा आहे .

तो , " हुश्श " 

ती - " काय झालं " 

तो - " मला वाटलं एवढा वेळ रिप्लाय आला नाही म्हणजे तुझाच साखरपुडा आहे . ऐक एवढ्या लवकर लग्न करू नकोस . लहान वयात लग्न केलं तर सासरची मंडळी खूप त्रास देते . " 

ती - " तुला कोणी सांगितलं मी एवढ्यात लग्न करणार आहे . अजुन वेळ आहे मला आणि डोन्ट  वरी मी माझ्या मनाविरुध्द लग्न करणार नाही . आणि अन्याय तर बिलकुल सहन करणार नाही . " 

तो - " good " 👍👍👍❣️❣️❣️😊😊😊

ती - "  चल आता बाय " 

तो  - " एवढ्यात का बरं ? " 

ती - " अरे तू हे अकाऊंट बोलण्यासाठी नाही ना ओपन केलं . उगाच तुला डिस्टर्ब नंतर तू पोस्ट शेअर करतो . त्यापेक्षा आता बाय बोललेल चांगलं . "

तो - " अरे यार त्या पोस्ट तुझ्यासाठी नव्हत्या . बाकिंच्यासाठी होत्या . खूप बायका आहेत इथे त्या साहित्याला कॉमेंट नाही करत पण इनबॉक्स मध्ये मेसेज करून सांगतात तुमचं साहित्य खूप छान आहे . वैगरे वैगरे हवं तर स्क्रीन शॉर्ट पाठवू का तुला . " 

ती - " असेल ठीक आहे बोल मग बाकी काय म्हणतोस?

तो - बाकी काही नाही आता जेवण करायचं आहे ... तुझ काय चालू आहे . Clg वगैरे मस्त ना . "

ती " एकदम झकास "

तो - " चल मी जेवून घेतो . बोलू परत अस म्हणून ऑफलाईन जातो .."

नित्या ला काही झोप येत नव्हती . मग ती एकदम सुंदर एक नवीन रचना tyipe करते ...

    🌹कल्पना म्हटलं तरी ती एक भावना असते 🌹


कल्पना म्हटलं तरी ती एक भावना असते ,
कोणाच्यातरी अंतकरणातून आलेली ती एक हाक असते 
कधी ...
भूकाळातील मनावर झालेल्या जखमांची ती साक्ष देते ,
तर कधी ...
भविष्यातील एक आपल्याला हवे असणारे सुंदर चित्र रंगवते...

कधी ....
समाजात घडणाऱ्या विक्षिप्त घटनांवर ती चर्चा करते ,
तर कधी ...
कोरपर्डी सारख्या घटनांनी ती डोळ्यांत पाणी आणते ...

कधी ....
आठवणींच्या हिंदोळ्यावर नेते ,
तर कधी ....
हरवलेले बालपण जागी करते ....

अहो कल्पना म्हटलं तरी ती एक भावना असते ,
कवी लोकांच्याच आयुष्यातील ती एक सुंदर कल्पना असते ...
तर कधी कधी वास्तविकता ही असते ..
कल्पना म्हटलं तरी ती एक भावना असते....!!!

तिच्या ह्या रचनेला राहुल एकदम सुंदर कॉमेंट करतो ..

तू सुंदर आहेसच पण तुझे विचार हे त्याहूनही सुंदर ..
❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️👌👌👌👌👌👌

 कधी झुलतो प्रेमाच्या हिंदोळ्यावर,
कधी स्वप्न आकाशी विहारतो मी , 
असच काल्पनिक जगात जगतो मी ,

 कधी चंद्रावर तिच्यासोबत असतो ,
 तर कधी तिच्यासाठी चंद्र तारे तोडतो ,
असाच काल्पनिक जगात वावरतो मी ...

सुचतात शब्द मला एक एक ,
 त्याचं शब्दात तुझी प्रतिमा पाहतो मी , 
करतो तुझ्यावर कविता काल्पनिक ... 
अशी एवढी सुंदर आणि एवढी मोठी कॉमेंट राहुल ने तिला केली होती ती तर खूप खूष झाली होती . कारण ती कविताच राहुलने तिच्यासाठी लिहिली होती . 

नंतर त्यांचे सुर खूपच छान जुळले होते . तो खूप अकड कडू होता . पण ती बिचारी सरळ साधी नेहमीच त्याला समजून घ्यायची . तसा तो ही खूप चांगला होता मनाने . तिची काळजी करायचा . समजाऊन सांगायचं खूप साऱ्या गोष्टी ह्याच्यामुळेच तिला कळल्या होत्या . ब्लु फिल्म बद्दल काहीचं माहीत कधी हिने ऐकल पण नव्हत 
आणि आज अचानक हिच्या इनबॉक्स मध्ये एक मेसेज आला होता . तुम्ही लिहिता खूप छान पण xx शिर्षक देता . लोक खूप वाईट वाईट बोलता . ब्लु फिल्म वैगरे वैगरे बोलता तुम्ही तस् शिर्षक देऊ नका . 

ब्लु फिल्म 🤔🤔🤔🤔
हा काय नवीन प्रकार आहे .. ती लगेच राहुल ला मेसेज करते . काय रे त्या ब्ल्यू फिल्म चांगल्या असतात का ? 
त्याने रिप्लाय दिला हो  . तिने रिटर्न रिप्लाय दिला thanks ..

परत त्याचा मेसेज आला , " हे बाई त्या चांगल्य
 नसतात त्याची पण एक कॅटेगिरी असते . ते बघण चांगलं नाही . पण कधी कधी चालत . पण अती बघू नये . जास्त बघण्यात आली तर आपल्याला आपल्या रिअल लाईफ मधला आनंद अनुभवता येत नाही ...
मग तो तिला ब्ल्यू फिल्म बद्दल रीतसर कट टू कट माहिती सांगतो . ती त्याला न राहून एक प्रश्न विचारते . तुला कस रे माहीत त्या फिल्म बघितल्या ने रिअल लाईफ मधला आनंद मिळत नाही .
त्याने तिला सांगितल मी पण बघतो कधी कधी आणि वाचलेलं पण आहे ....तुला बघायच्या असल्या तर बघू शकते . पण कमी प्रमाणात ..
 
ती " हे बाबा मला काही बघायच्या नव्हत्या मी जस्ट विचारल आणि असा काही विचीत्र प्रकार आहे . हे जर माहीत असतं तर , कधी विचारल पण नसत . ह्यानंतर तुला काहीही विचारण्याआधी दोन तीन वेळेस विचार नक्कीच करत जाईन . आणि मगच विचारत जाईन ." 

तो - " इट्स ओके अग चालत ठीक आहे . " 🤣🤣😂😂😂😂😂😂😂
त्यानंतर ते दोघे पण खूप असतात . पुन्हा एकदा नव्याने एकमेकांना भेटतात ....
त्यांचं bond खूप छान होत चाललं असताना अचानक तो hide होतो . ती त्याला मेसेज पण टाकते काय कुठे गायब ? पण त्या मेसेज ला ही काही रिप्लाय आलेला नसतो ..
त्याच्या आठवणीने हीचा जीव मेटाकुटीला आलेल
 असतो . कारण सवय झाली होती त्याची ...आणि एक दिवस अचानक तो एक पोस्ट शेअर करतो ...

आपला प्रवास इथपर्यंत च होता . कामाच्या व्यापामुळे मला हे अकाऊंट सोडून जावं लागतं आहे ... 

तिला तर खूपच वाईट वाटत . हा असा कसा काहीचं न सांगता असा hide कसा झाला . मग त्याचा मित्र शशी त्याच्यामुळे च हिने त्याला भाव दिला होता . 
शशी खूप चांगला मुलगा होता . त्याचं आणि नित्या च boud पण खूप छान होतं . मग ती डायरेक्ट त्यालाच कॉल करते आणि विचारते . 
 " काय रे तुझा मित्र असा कसा , काहीचं न सांगता hide झाला आणि कायमचं अकाऊंट बंद करून गेला .
अटॅक येतात की ह्याला . इगो आणि attitude तर आहेच . हे माहीत होतं .पण असेही अटॅक येतात . हे नव्याने कळलं ..

शशी - " अग तो असाच आहे . कुठल्या मुलीशी बोलत पण नाही.  तुझ्याशी कशी काय मैत्री केली हेच मला कळेना . आणि त्याने काही अकाऊंट बंद नाही केलं . येईल तो येते त्याला अशी फिरकी कधी कधी काळजी करू नकोस ...ओके ना 

ती ,- ओके चालेल ठेवते मी छान वाटलं तुझ्याशी बोलून चल आता टेक केअर ..." 

असं म्हणत ती फोन ठेवून देते ......❣️❣️❣️❣️❣️

काय वाटतं तुम्हाला येईल का परत राहुल वळणावर आहात ना उत्सुक मी पण आहे बघुया पुढच्या भागात ..
तो पर्यंत एन्जॉय 😊😊😊😊👍👍👍👍

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...